WhatsApp ने पुन्हा आणले ४ दमदार फीचर्स; आता ऑडिओ, व्हिडीओ कॉलची मजा होणार दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:19 IST2024-12-13T14:08:16+5:302024-12-13T14:19:01+5:30

WhatsApp आपल्या युजर्ससाठी रोज नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे.

WhatsApp आपल्या युजर्ससाठी रोज नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. या फीचर्समुळे युजर्सना खूप मदत होते. युजर कम्युनिकेशन सुधारण्यासाठी चार नवीन फीचर्सवर काम करत असल्याचं कंपनीने आता म्हटलं आहे.

युजर कम्युनिकेशन सुधारण्यासाठी चॅट मेसेज ट्रान्सलेट फीचर येत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. हे युजर्सना ग्रुप कॉलमध्ये पार्टिसिपेंट्स निवडण्याची आणि व्हिडीओ कॉल दरम्यान स्नॅप आणि इन्स्टा-सारखे पप्पी इअर्स सारखे मजेदार इफेक्ट्स वापरण्याची परवानगी देतं.

याआधी WhatsApp ग्रुपमध्ये कॉल केल्यावर ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांना एकाच वेळी नोटिफिकेशन मिळायचं. त्यांच्यापैकी ज्यांना पाहिजे असेल ते जॉईन होऊ शकतात.

आता WhatsApp ने ही सुविधा दिली आहे की, तुम्ही पार्टिसिपेंट्स निवडू शकता. याचा फायदा असा होईल की, या कॉलमुळे संपूर्ण ग्रुपला त्रास होणार नाही. यामध्ये तुम्ही निवडलेल्या लोकांनाच नोटिफिकेशन मिळेल.

WhatsApp ने आता व्हिडीओ कॉल्स अधिक मजेदार बनवले आहेत. आता तुम्ही व्हिडिओ कॉल दरम्यान वेगवेगळे इफेक्ट्स निवडू शकता.

आता तुम्हाला कॉल सुरू करण्यासाठी किंवा कॉलसाठी लिंक तयार करण्यासाठी किंवा डायरेक्ट नंबर डायल करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा सहज मिळतील.

WhatsApp ने व्हिडिओचा दर्जा आणखी चांगला केला आहे. तुम्ही तुमच्या मोबाइल किंवा डेस्कटॉप ॲपवरून व्हिडीओ कॉल केल्यास, तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त रिझोल्यूशनसह व्हिडीओ दिसेल. खूप दिवसांपासून याची गरज होती.