जुन्या स्मार्टफोनला असा बनवा घरचा 'सिक्युरिटी कॅमेरा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:26 IST2019-08-19T14:13:03+5:302019-08-19T14:26:37+5:30

स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र फोन जुना झाल्यावर नवीन स्मार्टफोन घेतला जातो. जुन्या फोनचा देखील काही कामाकरता चांगला वापर करता येतो हे फार कमी लोकांना माहीत आहे.
'सिक्युरिटी कॅमेरा' सध्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र अनेकदा तो महाग असल्याने विकत घेतला जात नाही. जुन्या स्मार्टफोनला 'सिक्युरिटी कॅमेरा' करता येतं. कसं ते जाणून घेऊया.
जुन्या अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनला घरी सिक्युरिटी कॅमेरा वाय-फाय किंवा कमीत कमी 4G कनेक्शनची गरज आहे. तसेच फोनचं चार्जिंग लवकर संपू नये, म्हणून पॉवर बँकेचीही आवश्यकता आहे.
युजर्सच्या सुरक्षिततेचा विचार करता गुगल अकाऊंटचा वापर न करण्याचा सल्ला आहे. जुन्या स्मार्टफोनची फॅक्ट्री रिसेट करावा लागणार आहे. तसेच गुगल प्ले-स्टोरवर जाऊन अल्फ्रेड कॅमेरा अॅप उपलब्ध आहे. हा अॅप इन्स्टॉल आणि रजिस्टर करावा लागेल.
दुसऱ्या स्मार्टफोनवर पाहा लाइव्ह फीड
अॅप सेटअप करताना 'i use this device as' हा प्रश्न आल्यावर कॅमेरा हा पर्याय निवडा. त्यानंतर गुगल अकाऊंटच्या मदतीने लॉग-इन करावे लागेल.
आपल्या पर्यायी अकाउंटवर लॉग-इन केल्यानंतर आपला स्मार्टफोन हा सिक्युरिटी कॅमेरावर लाइव्ह स्ट्रीमिंगची सुरुवात होईल.
दुसऱ्या एका स्मार्टफोनवर अॅप डाउनलोड करावा लागेल. हा अॅप सेटअप करताना 'i use this device as' हा प्रश्न आल्यावर, 'Viewer' हा पर्याय निवडा आणि त्याच गुगल अकाऊंटवरुन लॉग-इन करा. त्यानंतर तुम्ही जुन्या स्मार्टफोनच्या कॅमराची लाइव्ह फीड पाहू शकता.
अॅप्सचा वापर करण्यासाठी त्याचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. alfred.computer साईटवर जाऊन गुगल अकाऊंटच्या मदतीने साइन-इन करा.