जबरदस्त! WhatsApp मध्ये मिळणार AI चॅटबोट, असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:42 AM2023-12-29T10:42:30+5:302023-12-29T10:47:20+5:30

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नवीन अपडेट देत असतं.

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना नेहमी फिचर देतं असतं. यात नवीन बदल असतात. आता जगभरात AI तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे.

प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने जोडली जात आहेत. आता मेटा व्हॉट्सअॅपमध्ये एआय चॅटबॉटलाही सपोर्ट करणार आहे. याचे चित्र समोर आले आहे.

लवकरच तुम्ही WhatsApp मध्ये Meta AI चॅटबॉट वापरण्यास सक्षम असाल. सध्या कंपनी त्यावर काम करत आहे आणि काही बीटा टेस्टर्सकडे ते उपलब्ध आहे. नवीन एआय चॅटबॉट पर्याय कुठे शोधायचा आणि तो कसा दिसेल याचे एक चित्र इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

तुम्हाला चॅट विंडोच्या खाली हिरव्या प्लस आयकॉनच्या वर Meta AI Chatbot चा पर्याय दिसेल. सेटिंग्जमधून ते चालू केल्यावर तुम्हाला एक गोल निळ्या रंगाचा पर्याय दिसेल. म्हणजेच ते बाय डीफॉल्ट अॅपमध्ये येणार नाही. याचा फायदा अशा लोकांना होईल ज्यांना ते वापरायचे नाही आणि फक्त मेसेजिंगचा आनंद घ्यायचा आहे.

एआय चॅटबॉट चालू करण्यासाठी तुम्हाला चॅट सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि येथे तुम्हाला 'शो मेटा एआय बटण' चा पर्याय मिळेल. असे केल्यावरच तुम्हाला चॅट विंडोमध्ये बाहेर AI चॅटबॉट दिसेल.

Meta AI च्या मदतीने तुम्ही इतर चॅटबॉट्सप्रमाणेच विविध विषयांवर माहिती मिळवू शकाल. चॅटबॉटशी संभाषण सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला एक पर्याय मिळेल यामध्ये तुम्हाला सर्व T&C स्वीकारावे लागतील.

चॅटबॉटमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी कंपनी आपला AI चॅटिंग अनुभव वापरेल असे सांगण्यात आले आहे. म्हणजेच तुमची चाचणी, प्रश्नांची पद्धत इत्यादी सर्व गोष्टींचा एआय चॅटबॉट सुधारण्यासाठी वापर केला जाईल.

Meta AI तुमच्या वैयक्तिक चॅट्स वाचणार नाही आणि त्या पूर्वीप्रमाणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील.