तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp वर स्वतःचा नंबर न वापरता करू शकता मेसेज; जाणून घ्या, नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 03:37 PM2021-12-22T15:37:10+5:302021-12-22T15:48:24+5:30

Whatsapp News : युजर्स स्वतःचा नंबर न वापरता व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट तयार करू शकतात. अशा युजर्ससाठी आता एक सोपी पद्धत उपलब्ध आहे.

WhatsApp वर युजर्ससाठी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. मात्र हे सर्व फीचर्स वापरण्यासाठी युजर्सला मोबाईल नंबर वापरून रजिस्टर्ड करावा लागतो. पण अनेकांना स्वतः चा नंबर WhatsApp अकाऊंटसाठी वापरायचा नसतो.

युजर्स स्वतःचा नंबर न वापरता व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट तयार करू शकतात. अशा युजर्ससाठी आता एक सोपी पद्धत उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला व्हर्च्यूअल नंबरची मदत घ्यावी लागेल. तुम्ही व्हर्च्यूअल नंबरने WhatsApp वर रजिस्टर्ड करू शकता.

व्हर्च्यूअल नंबर तुमच्या फिजिकल सिम कार्डपेक्षा वेगळा असतो. मात्र, तुम्ही नियमित नंबरप्रमाणे याचा फोन व मेसेज रिसिव्ह करण्यासाठी वापर करू शकता. व्हर्च्यूअल नंबरसाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल.

यासाठी Doosra, TextNow सारखे अ‍ॅप आणि Sontel सारख्या वेबसाइट्सची मदत घेऊ शकता. अनेक वेबसाईट्स आणि अ‍ॅप देखील मोफत व्हर्च्यूअल नंबर मोफत देतात. मोफत नंबरचा वापर इतर युजर्स देखील वापर करू शकतात व यामुळे तुम्ही नंबरचा एक्सेस गमावू शकता.

Doosra अ‍ॅपला तुम्ही सहज डाऊनलोड करू शकता. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर अ‍ॅप तुम्हाला व्हर्च्यूअल नंबर देईल. या नंबरचा वापर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटसाठी करू शकता. तुम्हाला अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी अ‍ॅपवर ओटीपी मिळेल.

या नंबरचा वापर करून तुम्ही मेसेज करू शकता व तुमचा दुसरा नंबर सुरक्षित राहिल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. WhatsApp युजर्सचं चॅटिंग गंमतीशीर आणि आणखी मजेशीर होण्यासाठी प्रयत्न करत असतं.

WhatsApp ने एक धमाकेदार फीचर पुन्हा एकदा आणलं आहे. Voice Messages साठी खास फीचर आणलं असून या फीचरद्वारे वॉइस प्रीव्ह्यूचा पर्याय मिळेल. युजर्स WhatsApp वर वॉइस मेसेज सेंड करण्याआधी ऐकू शकतील. यामुळे योग्य वॉइस मेसेज पाठवण्यासाठी मदत मिळेल.

WhatsApp ने एक धमाकेदार फीचर पुन्हा एकदा आणलं आहे. Voice Messages साठी खास फीचर आणलं असून या फीचरद्वारे वॉइस प्रीव्ह्यूचा पर्याय मिळेल. युजर्स WhatsApp वर वॉइस मेसेज सेंड करण्याआधी ऐकू शकतील. यामुळे योग्य वॉइस मेसेज पाठवण्यासाठी मदत मिळेल.

WhatsApp चे वॉइस मेसेजेस फीचर लोकप्रिय आहे. यामुळे वॉइस मेसेज करण्याची व ऐकण्याची सुविधा मिळते. WhatsApp वर वॉइस मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर आतापर्यंत पुन्हा ऐकता येत नव्हतं. पण आता नवीन फीचरमुळे वॉइस मेसेज पाठवण्याआधी युजर्सला ऐकता येणार आहे.

तुम्हाला WhatsApp वर एखादा व्यक्ती किंवा ग्रुप चॅट ओपन करावे लागेल. चॅट ओपन केल्यानंतर मायक्रोफोनवर टच करा आणि स्लाइड अप करून हँड्स-फ्री रेकॉर्डिंगला लॉक करा. त्यानंतर तुम्ही वॉइस रेकॉर्ड करू शकता. बोलणे पूर्ण झाल्यानंतर स्टॉपवर टॅप करा.

प्लेवर टॅप करून आता तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. युजर्स टाइम स्टँपद्वारे रेकॉर्डिंगच्या कोणताही भाग ऐकू शकतील. रेकॉर्डिंग न आवडल्यास ट्रॅशवर टॅप करून वॉइस मेसेजला डिलीट करता येईल. जर तुम्हाला वॉइस मेसेज योग्य वाटत असल्यास सेंडवर क्लिक करून इतर युजर्सला पाठवू शकता.