...नाहीतर तुमचं WhatsApp अकाऊंट होईल हॅक, "या" सेटिंग्ज लगेचच बदला अन् वेळीच घ्या खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 02:49 PM2021-02-22T14:49:01+5:302021-02-22T15:04:39+5:30

WhatsApp News : सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनने सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला अलर्ट केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक मोठ्या प्रमाणात या नव्या पॉलिसीचा विरोध करताना दिसत आहे. याच दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित नवनवीन माहिती ही समोर येत आहे.

सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनने सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला अलर्ट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सनी त्वरित आपल्या सेटिंग्जमध्ये बदल करावेत अन्यथा त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे.

हॅकर्सनी व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी नवा मार्ग शोधला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ज्यात मालवेअरद्वारे हॅकर्स दूरुनच युजर्सच्या फोनमध्ये येणारा सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळवू शकतात. त्यानंतर हॅकर्स त्यांच्या डिव्हाईसवर युजर्सचं व्हॉट्सअ‍ॅप रन करू शकतात.

स्कॅमचा, फसवणूकीचा खुलासा गेल्या वर्षी यूकेतील एका मीडिया हाऊसनेही केला होता. त्यानंतरही अशाप्रकारचे हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारचे हॅकिंग प्रकार रोखण्यासाठी फोनमध्ये एका सेटिंगद्वारे बदल केले जाऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स हॅकिंगपासून वाचण्यासाठी एक सेटिंग करू शकतात. ही सेटिंग टू-स्टेप व्हेरिफिकेशन आहे. यामध्ये एक सहा डिजिटचा कोड सेट करावा लागतो. या कोडमुळे दुसऱ्या डिव्हाईसवर लॉगइन करताना या कोडनेही करता येऊ शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना आकर्षित करण्यासाठी आता नवनवीन भन्नाट फीचर्स आणत आहे. असंच एक हटके फीचर पुन्हा एकदा आणलं असून याचा मोठा फायदा हा आता युजर्सना होणार आहे. फेसबुकप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपवरही लॉग आऊट करता येणार आहे.

सोशल मीडिया साईट फेसबुक आदीमध्ये आपण ऑनलाईन येण्यासाठी लॉगिन करतो आणि ऑफलाईन जाण्यासाठी लॉग आऊट करतो. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देखील अशी सुविधा लवकरच येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आपण नेहमीसाठी लॉगिन राहतो. फोनमध्ये इंटरनेट ऑन असेल तर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येऊ शकतात. त्यावर काहीही बंधन नाही. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपपासून लोकांना ब्रेक देण्यासाठी हे नवीन फीचर येत आहे.

युजर्संला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच एक नवीन लॉग आऊट फीचर मिळणार आहे. या फीचर्सची अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व युजर्संना फोनमध्ये इंटरनेट सुविधा असल्यास 24 तास अ‍ॅक्टिव्ह राहतात.

लागोपाठ मेसेज आल्यानंतर फोनवर लक्ष जाते. इंटरनेट बंद असल्यानंतर मेसेज येत नाही. आता व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलीट अकाउंटचा पर्याय हटवला जाणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जनमध्ये नवीन लॉग आऊट फीचरला समावेश करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन लॉग आऊट फीचर व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस व्हर्जनमध्ये दिले आहे. हे अ‍ॅप युजर आणि अँड्रॉयड युजर्स दोन्हींना मिळणार आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा चार ठिकणी वापर करता येणार आहे. मल्टी डिव्हाईस असं या फीचरचं नाव असून हे युजर्ससाठी येत्या काळात अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.