Google Event : अनेक जबरदस्त फीचर्ससह Pixel 6, Pixel 6 Pro लाँच; पाहा Specification, किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 09:42 AM2021-10-20T09:42:14+5:302021-10-20T09:49:56+5:30

मंगळवारी झालेल्या इव्हेंटमध्ये Google ने आपले Pixel 6, Pixel 6 Pro स्मार्टफोन्स लाँच केले. Camera मध्ये केले बदल, 5G सपोर्टही मिळणार, पाहा काय आहे खास.

मंगळवारी झालेल्या इव्हेंटमध्ये Google ने आपले Pixel 6, Pixel 6 Pro स्मार्टफोन्स लाँच केले. Pixel 6 सीरिजमध्ये Google ने तयार केलेला Tensor चिपसेट देण्यात आला आहे. दरम्यान, Tensor AI फंक्शनलिटीला अधिक उत्तम बनवेल अशी प्रतिक्रिया गुगलकडून देण्यात आली.

याशिवाय नव्या चिपसेटमुळे सुरक्षेतही अधिक वाढ होणार असल्याचं गुगलनं म्हटलं आहे. Google Pixel 6 मध्ये डिस्टिंक्ट कॅमेरा बार देण्यात आला आहे. या स्मार्टफोन्समध्ये (Smartphones) ऑलवेज ऑन डिस्प्लेही देण्यात आलाय.

याशिवाय या स्मार्टफोनमध्ये Android 12 सपोर्ट देण्यात आला आहे. सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने हे स्मार्टफोन डिझाईन करण्या आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

Google Pixel 6 सीरिजसह गुगलनं तयार केलेले नवे कव्हर्सही मिळणार आहे. या अॅक्सेसरीज कंपनीनं रिसायकल केल्या जाणाऱ्या मटेरियल पासून तयार केल्या आहेत. Google Pixel Material You या फीचर्ससह त्या मिळतील.

वॉलपेपरच्या कलरनुसार त्या इंटरफेस अॅडोप्ट करतील. याचाच अर्थ क्लॉक आणि आयकॉन तोच कलर घेईल ज्या कलरचं बॅकग्राऊंड असेल. Google Pixel 6 आणि Google Pixel 6 pro मध्ये सिक्युरीटी वाढवण्यासाठी Titan M2 सादर केलं आहे.

या स्मार्टफोन्समध्ये पुढील पाच वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपटेड्स दिल्या जातील. Google Pixel 6 मध्ये एक सिक्युरिटी हब देण्यात आला आहे. याच्या सहाय्यानं सहज सिक्युरिटी सेटिंग्स आणि प्रायव्हसी डॅशबोर्ड अॅक्सेस करता येतील. तसंच कोणतं अॅप मायक्रोफोन आणि कॅमेरा अॅक्सेस करत आहे हेदेखील तुम्ही पाहू शकता.

Tensor GPU आणि CPU बाबात सांगताना हा यापूर्वीच्या पिक्सेलच्या तुलनेत अधिक फास्ट असल्याचं त्यांनी म्हटलं. Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro कंपनीनं 50 मेगापिक्सेलचा मेन सेन्सर दिला आहे. याशिवाय दोन्ही फोन्समध्ये 12MP अल्ट्रावाईड कॅमेरा देण्यात आला आहे. Google Pixel 6 Pro मध्ये 48 MP टेलिफोटो लेन्स 4x झूमसोबत देण्यात आली आहे.

Google Pixel 6 सोबत उत्तम व्हिडीओदेखील तयार करता येऊ शकतो. Google Pixel 6 मध्ये 4K व्हिडीओ HDRnet 60fps वर रेकॉर्ड केला जाऊ शकतो. तसंच कॅमेऱ्यासोबत Magic Eraser आणि Face Unblur असे फीचर्सही देण्यात आले आहेत.

Google Pixel 6 मध्ये स्पीचवरही फोकस करण्यात आलं आहे. Tensor मुळे कॉल स्क्रीनही अधिक इम्प्रूव्ह करण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही कोणालाही कॉल कराल तेव्हा तुम्हाला हिस्टॉरिक वेट टाईम दाखवण्यात येईल. यामुळे तुम्ही किती वेळ होल्डवर राहाल हे दिसेल. स्मार्टफोनमधून रियल टाईम ट्रान्सलेशनही करता येणार आहे.

Google Pixel 6 मध्ये कनेक्टिव्हीटीसाठी 5G सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आलाय. Google Pixel 6 ची किंमत 599 डॉलर्स म्हणजेच 44,900 रूपये निश्चित करण्यात आली आहे. Google Pixel 6 Pro ची किंमत 899 डॉलर्स म्हणजेच जवळपास 67,500 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हे स्मार्टफोन प्री ऑर्डर करू शकता. परंतु भारतात हे फोन कधी उपलब्ध होतील याबाबत माहिती देण्यात आली नाही.