AI मुळे झटक्यात गेल्या १२००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या! Oracleच्या कपातीवर काय म्हणाले परप्लेक्सिटीचे CEO? "नोकरी गेली तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:02 IST2026-04-02T15:52:41+5:302026-04-02T16:02:35+5:30
Oracle layoffs 12000 jobs : या कर्मचारी कपातीचे मुख्य कारण AI असल्याचे बोलले जात आहे. यातच, आता 'परप्लेक्सिटी'चे सीईओ अरविंद श्रीनिवास यांचे एक विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे...

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी, अशी ओळख असलेल्या ओरॅकलने भारतात तब्बल १२००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचारी कपातीचे मुख्य कारण AI असल्याचे बोलले जात आहे. यातच, आता 'परप्लेक्सिटी'चे सीईओ अरविंद श्रीनिवास यांचे एक विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

'ऑल इन पॉडकास्ट'मध्ये बोलताना, नोकरी गमावलेल्यांनी या परिस्थितीकडे एक संधी म्हणून बघायला हवे. असा सल्ला अरविंद श्रीनिवास यांनी दिला आहे.

अरविंद श्रीनिवास म्हणाले, "AI मुळे तात्पुरत्या स्वरूपात नोकऱ्या कमी होतील, पण हेच तंत्रज्ञान लोकांना छोटे व्यवसाय सुरू करण्याची आणि कमाईचे नवीन मार्ग शोधण्याची संधी देते."

अनेक लोक आपल्या नोकरीवर खुश नसतात, अशांसाठी या टूल्सचा वापर करून स्वतःचे काम सुरू करणे हा उत्तम पर्याय असल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले. मात्र, व्यवसाय सुरू करणे एवढे सोपे नाही. असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्या या मतावर टीकाही केली आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, आगामी ५ वर्षांत एकट्या अमेरिकेतच सुमारे ९० लाख नोकऱ्यांवर AI चा परिणाम होऊ शकतो, ज्यामध्ये प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्ससारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

दरम्यान, ओरॅकलची ही कपात केवळ सुरुवात असून, कंपनी जागतिक स्तरावर एकूण ३०,००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे. आगामी काळात बेरोजगारीचा स्तर ३० टक्क्यांहून अधिक वाढण्याची भीतीही उद्योग क्षेत्रातील लिडर्सनी वक्त केली आहे.


















