Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:37 IST2025-10-01T18:29:57+5:302025-10-01T18:37:29+5:30

Upcoming smartphones In October: ऑक्टोबर २०२५ हा महिना स्मार्टफोन प्रेमींसाठी एक मेजवानी ठरणार आहे.

वनप्लस त्यांच्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस १५ लॉन्च करत आहे. या फोनमध्ये 165Hz LTPO OLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चिपसेट आणि १२० वॅट फास्ट चार्जिंगसह ७००० mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळू शकतो.

ओप्पो फाइंड एक्स ९ सिरीज १६ ऑक्टोबर रोजी लॉन्च करणार आहे. या फोनच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये ६.५९ इंचाचा १.५K OLED डिस्प्ले, ७,०२५mAh बॅटरी आणि Hasselblad कॅमेरा ब्रँडिंग असेल. प्रो व्हेरिएंटमध्ये ७५००mAh बॅटरी मिळेल.

विवो एक्स ३०० आणि विवो एक्स ३०० प्रो हे दोन्ही स्मार्टफोन १३ ऑक्टोबर रोजी लॉन्च होणार आहे. या फोनमधील मुख्य आकर्षण म्हणजे २०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, तसेच प्रो व्हेरिएंटमध्ये २०० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स मिळेल. या मालिकेमध्ये डायमेन्सिटी ९५०० चिपसेट आणि नवीन OriginOS ६ सॉफ्टवेअर असेल.

मध्यम श्रेणीतील विवो व्ही ६० ईमध्ये डायमेन्सिटी ७३०० प्रोसेसर, ५०MP + ८MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि ६५००mAh बॅटरी असेल. या फोनचा डिझाइन विशेष असेल, ज्यात क्वाड-कर्व डिस्प्ले आणि डायमंड शील्ड ग्लास प्रोटेक्शन दिले जाईल.

शाओमी भारतात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन शाओमी १७ लॉन्च करणार आहे. यामध्ये ६.३ इंचाचा १.५K OLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ प्रोसेसर आणि ७,०००mAh बॅटरी असेल. फोनमध्ये एआय-आधारित विविध फीचर्स दिली जातील, असा दावा केला जात आहे.

ओप्पो फाइंड एक्स९ अल्ट्रा हा ओप्पोचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये डायमेन्सिटी ९५०० प्रोसेसर, २००MP टेलिफोटो कॅमेरा आणि १२GB RAM + २५६GB स्टोरेज संयोजन असेल. हा फोन Android १६ वर आधारित ColorOS १६ सॉफ्टवेअरवर काम करेल.