आता YouTube लाही पैसे भरावे लागणार! नाहीतर ही सेवा बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:44 IST2026-01-27T13:38:41+5:302026-01-27T13:44:19+5:30
आपल्याकडे YouTube पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण, आता वापरकर्त्यांना मोठा झटका बसला आहे.

आतापर्यंत फ्रीमध्ये व्हिडीओ कंटेट फक्त YouTube वरच पाहता येत होता. अनेक जण YouTube चा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण, आता वापरकर्त्यांना मोठा झटका बसणार आहे.

YouTube लवकरच त्यांच्या सर्वात उपयुक्त फिचरपैकी एक प्रीमियम वापरकर्त्यांपुरते मर्यादित करू शकते. या फिचरला प्लेबॅक स्पीड म्हणतात आणि बरेच लोक ते वापरतात. अशा परिस्थितीत, भविष्यात वापरकर्त्यांना प्लेबॅक स्पीड फिचर वापरण्यासाठी YouTube चे प्रिमियम व्हर्जन खरेदी करावी लागू शकते. YouTube यावर प्रयोग करत आहे.

रील्स आणि शॉर्ट्सच्या युगात, लोक कोणत्याही कंटेंटवर घालवण्याचा वेळ मर्यादा खूपच कमी झाली आहे. यामुळेच लोक YouTube वर त्यांचा वेग वाढवून लांब व्हिडीओ पाहतात. व्हिडिओचा वेग वाढवणाऱ्या फीचरला प्लेबॅक स्पीड म्हणतात. दरम्यान, Reddit वर एक पोस्ट केली आहे.यामध्ये YouTube हे प्लेबॅक फीचर प्रीमियम सबस्क्रिप्शन असलेल्यांसाठी मर्यादित करू शकते.

YouTube यावर प्रयोग करत आहे, असा दावा केला आहे. भविष्यात, जर तुम्हाला कोणताही व्हिडीओ फास्ट फॉरवर्डमध्ये म्हणजेच स्पीड वाढवून पहायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधी YouTube चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.

YouTube सध्या या फिचरची चाचणी घेत आहे. YouTube सध्या या बदलाचा प्रयोग म्हणून विचार करत आहे. Reddit वापरकर्त्याच्या मते, YouTube ने वापरकर्त्यांना दोन चाचणी गटांमध्ये विभागले आहे.

गट A वापरकर्त्यांना हे फिचर पूर्वीप्रमाणेच विनामूल्य मिळत आहे, तर गट B वापरकर्त्यांना प्लेबॅक स्पीड पर्याय लॉक केलेला आहे आणि ते वापरण्यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन आवश्यक आहे.

YouTube गेल्या काही काळापासून मोफत वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शनसाठी पैसे देण्यास भाग पाडत आहे. हे करण्यासाठी, ते वेळोवेळी त्यांच्या प्रीमियम प्लॅनमध्ये मोफत फिचर जोडत आहे.

गेल्या वर्षी, YouTube ने एक स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन देखील दिला होता. तो काही मर्यादांसह प्रीमियम फिचर देतो. मासिक YouTube प्रीमियम सबस्क्रिप्शनची किंमत सध्या एका वापरकर्त्यासाठी १४९ रुपये प्रति महिना आहे.

















