शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsAppच्या Beta व्हर्जनमध्ये नवीन फीचर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 6:22 PM

1 / 10
WhatsApp ने अँड्राईड आणि आयफोनसाठी आपल्या अॅपला लेटेस्ट बिटा व्हर्जनमध्ये एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्रुप कॉलची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
2 / 10
नवीन बिटा व्हर्सनमध्ये ग्रुप व्हिडिओ किंवा व्हाईस कॉलिंगसाठी आठ जण एकत्र येतील, असा सपोर्ट देण्यात आला आहे. याआधी फक्त चार जण एकत्र येऊन व्हिडिओ कॉल करण्याची मर्यादा होती.
3 / 10
गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप लॉकडाऊनच्या काळात ग्रुप कॉलिंगची मर्यादा वाढविण्यावर काम करत असल्याची माहिती समोर आली होती.
4 / 10
या लॉकडाऊनदरम्यान काळात अनेक कंपन्या आणि क्लास रुम बंद असल्यामुळे झूम आणि गुगल डुओ यांसारख्या लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरसिंग अॅपचा वापर करत आहे. त्यामुळे या अॅप्सना टक्कर देण्यासाठी व्हॉट्सअॅपने नवीन फीचर आणल्याचे बोलले जात आहे.
5 / 10
WhatsApp फीचर ट्रॅकर WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, WhatsAppवर आता व्हाईस किंवा व्हिडीओ कॉलमध्ये आठ युजर्स कनेक्ट होऊ शकतात.या नव्या फीचरला अँड्राईड युजर्ससाठी WhatsAppचे बिटा अॅप v2.20.133 मध्ये आणले आहे. तर आयफोनच्या युजर्ससाठी हे बिटा अॅप v2.20.50.25 आणले आहे.
6 / 10
WhatsApp च्या या नव्या फीचरला दोन्ही प्लॅटफॉर्म्सच्या बिटा युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. आशा आहे की, लवकरच याला स्टेबल व्हर्जनसाठी आणले जाईल.
7 / 10
WhatsApp फीचर ट्रॅकर WABetaInfo ने म्हटले आहे की, युजर्सला आठ जणांशी व्हिडिओ कॉल करण्यासाठी लेटेस्ट बिटा व्हर्जन अपडेट करावे लागेल. जर आधीच WhatsApp अपडेट केले असेल नाही, हे फीचर नसेल तर पुन्हा इंस्टॉल करु शकता.
8 / 10
WhatsApp मध्ये ग्रुप कॉल करण्यासाठी आपल्या ग्रुप ओपन करावा लागेल आणि टॉप राइटला असलेल्या कॉल बटनवर क्लिक करावे लागेल.
9 / 10
जर ग्रुपमध्ये आठहून अधिक जण असतील तर अॅप विचारेल कोणत्या युजर्संना कॉल करायचे आहे. जर आठपेक्षा कमी असतील तर कॉल सुरु होईल.
10 / 10
जे ग्रुप युजर्स आपल्या अॅड्रेस बुकमध्ये नाहीत, ते कॉलमध्ये सामील होणार नाहीत.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप