Netflix वर आता चित्रपटांसह गेम्स खेळण्याचा आनंद लुटता येणार, कंपनीकडून नवीन फीचर जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 03:00 PM2021-11-03T15:00:59+5:302021-11-03T15:13:48+5:30

Netflix : हे गेम्स सध्या फक्त Netflix च्या अँड्रॉइड अॅपसाठी उपलब्ध आहेत.

आता यूजर्स नेटफ्लिक्सवरही (Netflix) गेम खेळू शकणार आहेत. कंपनीने नवीन फिचर जारी केले आहे. या फीचरवर Netflix बऱ्याच दिवसांपासून काम करत होते. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर पाच मोबाईल गेम्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आता जगभरातील Netflix युजर्स देखील यावर गेमचा आनंद घेऊ शकणार आहेत.

Stranger Things: 1984 (BonusXP), Stranger Things 3: The Game (BonusXP), Shooting Hoops (Frosty Pop), Card Blast (Amuzo & Rogue Games) आणि Teeter Up (Frosty Pop) गेम्स Netflix वर उपलब्ध करण्यात आले आहेत.

Netflix ने सध्या हे मोबाईल गेम्स Android डिव्हाइससाठी उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही तुमच्या Android मोबाइल डिव्हाइसवरील डेडिकेटेड गेम्स टॅबमधून हे गेम्स घेऊ शकता. टॅबमध्‍ये गेम खेळण्‍यासाठी, तुम्हाला कॅटेगरी डाउन मेनूमधून गेम सिलेक्ट करावा लागेल.

यानंतर सिलेक्ट केलेला गेम Google Play वरून डाउनलोड करावा लागेल. एकदा डाउनलोड केल्यानंतर, गेम थेट Netflix अॅपवरून ऍक्सेस केला जाऊ शकतो.

हे गेम्स सध्या फक्त Netflix च्या अँड्रॉइड अॅपसाठी उपलब्ध आहेत. मात्र, ट्विटरवर कंपनीने सांगितले आहे की, ते iOS युजर्ससाठी देखील उपलब्ध केले जाणार आहे. हे गेम्स खेळण्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

कंपनी सध्या या गेम्सवर कोणताही अॅड किंवा अॅप-मधील परचेज ऑप्शन सु्द्धा आपल्या प्लॅटफॉर्मवर देत नाही. हे Netflix गेम्स अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. याचा अर्थ तुम्ही भारतीय भाषांमध्येही गेमचा आनंद घेऊ शकता.