मोबाईल वापरकर्त्यांना धक्का बसणार! सरकारने यादी तयार केली,आता 'या' ग्राहकांना नवीन सिम कार्ड मिळणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:45 IST2024-12-28T13:39:50+5:302024-12-28T13:45:45+5:30
२०२५ मध्ये टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. आता अधिक सिम कार्ड आपल्याला घेता येणार नाहीत.

काही दिवसातच २०२५ हे नवीन वर्ष सुरू होणार आहे. २०२५ या वर्षात अनेक नवीन बदल होणार आहेत, टेलिकॉम क्षेत्रातही बदल होणार आहेत.
मोबाईलवरील वाढत्या स्पॅम कॉल्स आणि फसवणुकीबाबत सरकारी यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. यावर आता नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विविध मोहिमा राबवत आहे. सरकारने दूरसंचार नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. यासोबतच आता सरकारने काही वापरकर्त्यांची यादी बनवली आहे. त्या वापरकर्त्यांना सिम कार्ड नवीन मिळणार नाही.
सरकारने eKYC व्हेरिफिकेशल अनिवार्य केले आहे, त्याशिवाय सिम कार्ड दिले जाणार नाही. सायबर फसवणूक आणि सिमकार्डचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने हे आवश्यक पाऊल उचलले आहेत.
जे वापरकर्ते दुसऱ्याच्या नावांवर सिम कार्ड खरेदी करतात आणि त्या नंबरचा गैरवापर करतात त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकार हे पाऊल टाकले आहे.
सायबर गुन्हेगार आता सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने काळ्या यादीची तयारी सुरू केली आहे. सिम कार्डच्या नियमांतर्गतही, दूरसंचार विभागाने बनावट कॉल आणि एसएमएस करणारे लाखो मोबाइल नंबर ब्लॉक केले आहेत.
जे वापरकर्ते इतरांच्या नावाने सिम खरेदी करून मोबाईल फसवणूक करतात. सरकार याला सायबर सुरक्षेसाठी धोका मानते. यामुळे आता त्यावर कारवाई होणार आहे.
दूरसंचार विभागाच्या काळ्या यादीत असलेल्या वापरकर्त्यांचे सिम पहिल्यांदा ब्लॉक केले जातील. याशिवाय ६ ते ३ वर्षांपर्यंत त्यांच्या नावावर कोणतेही नवीन सिमकार्ड दिले जाणार नाही.
कारवाई करण्यापूर्वी सरकार अशा वापरकर्त्यांना नोटीसही पाठवेल, यावर त्यांना ७ दिवसांत उत्तर द्यावे लागेल. यामध्ये काही प्रकरणे हिताचे असतील तर त्यावर कारवाई होणार नाही.पण काही प्रकरणांमध्ये कोणतीही नोटीस न पाठवता कारवाई केली जाईल.