मोबाईलच्या इतिहासातील सर्वात लक्षवेधी फोन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 04:00 PM2018-04-17T16:00:20+5:302018-04-17T16:01:00+5:30

मोबाईलवरुन करण्यात आलेल्या पहिल्या कॉलला काही दिवसांपूर्वीच 45 वर्षे पूर्ण झाली. 3 एप्रिल 1973 रोजी पहिल्यांदा मोबाईल कॉल करण्यात आला होता. हा कॉल मोटोरोलाच्या मोबाईलमधून करण्यात आला होता. एक किलोहून अधिक वजन असलेला हा फोन वारंवार चार्ज करावा लागायचा. 8 इंचाच्या या फोनची बॅटरी फुल चार्ज केल्यावर फक्त अर्धा तास चालायची. या फोनच्या दुसऱ्या व्हर्जनमध्ये बॅटरीची क्षमता वाढवण्यात आली. मात्र त्या फोनची किंमत तब्बल अडीच लाख होती. आतापर्यंत अनेक मोबाईल आले आणि गेले. मात्र त्यातले थोडेच फोन लक्षवेधी ठरले.

नोकिया 1100 हा जगातील सर्वाधिक विक्री झालेल्या फोन्सपैकी एक आहे. या फोनमध्ये टॉर्च होता. याशिवाय यात 50 एसएमएस सेव्ह व्हायचे. या फोनमधला स्नेक गेम अनेकांचा फेव्हरिट होता. दणकट बॉडी आणि तितकीच दणकट बॅटरी हे या फोनचं वैशिष्ट्यं होतं.

नोकिया 3310 ची बॉडी अतिशय मजबूत होती. फोन हातातून कितीही वेळा पडला, तरी त्याला फारसं काही व्हायचं नाही. हा फोन एखाद्याला फेकून मारला, तर समोरच्याला लागेल. मात्र फोन सुरक्षितच राहिल, असं म्हटलं जायचं.

एचटीसी ड्रिम हा पहिला अँड्रॉईड फोन होता. या फोनमध्ये स्लायडर की पॅड होता. याशिवाय एक बॉल होता. आधीच्या माऊसमध्ये बॉल असायचा, तसाच हा बॉल होता. माऊसच्या खाली असलेला बॉल ज्याप्रकारे कर्सर फिरवायचा, त्याचप्रकारे या फोनचा बॉल कर्सर फिरवायचा. हा फोन अतिशय स्टायलिश होता.

ब्लॅकबेरी क्वार्क ब्लॅकबेरी क्वार्कमध्ये एसएमएसची सुविधा होती. याशिवाय स्पीकरदेखील होता.

टॅग्स :मोबाइलMobile