LPG टंचाई: गॅस की इंडक्शन? तुमच्या खिशाला काय परवडणार? पहा खर्चाचे संपूर्ण गणित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:41 IST2026-03-12T12:19:57+5:302026-03-12T12:41:06+5:30

LPG vs Electric Cooking : गॅस सिलेंडर महागला तर काय करावे? इंडक्शन, केटल आणि ओव्हन वापरल्यास किती वीज बिल येईल? पहा ही विशेष फोटोगॅलरी आणि वाचवा पैसे.

जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा वेळी लोकांनी इंडक्शन शेगडी, इलेक्ट्रीक कुकर आदींकडे मोर्चा वळविला आहे. या उत्पादनांची मागणी जवळपास २०-३० टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचे म्हणजे इंडक्शन शेगडी ही १८००, २००० रुपयांच्या आसपास मिळते. परंतू, त्यासाठी वापरली जाणारी भांडी देखील तुम्हाला इंडक्शन बेस असलेली घ्यावी लागणार आहेत. उद्या समजा भारताकडील एलपीजी संपला, तुमच्याकडील एलपीजी संपला तर याची गरज भासू शकते.

अशावेळी गॅस सिलेंडर वापरणे परवडते की विजेवर चालणारी उपकरणे? या फोटोगॅलरीतून समजून घ्या तुमच्या किचनचा बजेट.

भारताची ८०% LPG गरज आयातीवर अवलंबून आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, भविष्यात गॅसचे दर १०००-१२०० रुपयांच्या पार जाण्याची भीती आहे.

इंडक्शनवर दररोज १ तास स्वयंपाक केल्यास दिवसाला १५ ते २० रुपए म्हणजेच दोन युनिट वीज वापरली जाईल. यानुसार साधारण ४२० ते ४८० रुपये मासिक वीज बिल येते. गॅस सिलेंडरच्या तुलनेत हा एक स्वस्त आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

७०० ते १००० वॅटचे हे उपकरण महिन्याला केवळ ९० ते १२० रुपयांची वीज खाते. गॅसवर भात शिजवण्यापेक्षा राइस कुकर वापरणे केव्हाही फायदेशीर ठरेल.

पाणी गरम करण्यासाठी गॅस वाया घालवण्यापेक्षा केटल वापरा. दिवसातून ५ वेळा वापरली तरी महिन्याचा खर्च फक्त १५० रुपयांच्या आसपास येतो.

पदार्थ गरम करण्यासाठी किंवा बेकिंगसाठी ओव्हन सोयीस्कर आहे. दररोज ३० मिनिटांच्या वापरासाठी महिन्याला २०० ते २४० रुपये खर्च येतो.

पूर्णपणे गॅसवर अवलंबून न राहता, काही गोष्टींसाठी वीज आणि काही गोष्टींसाठी गॅस वापरल्यास तुमच्या घरगुती बजेटवरचा ताण कमी होऊ शकतो.