अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन्..; Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन्स, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:58 IST2025-06-22T13:53:13+5:302025-06-22T13:58:51+5:30

Jio Recharge: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्सचा पर्याय मिळतो.

Jio Recharge: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लॅन्सचा पर्याय मिळतो. कंपनी अनेक स्वस्त आणि महागडे पर्याय देते, परंतु काही रिचार्ज व्हॅल्यू प्लॅनच्या यादीत सामील आहेत. यात आम्ही अशा काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे कमी किमतीत कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचे फायदे देतात.

तुम्ही दीर्घकालीन किंवा अल्पावधीसाठी परवडणाऱ्या प्लॅनच्या शोधात असाल, तर कंपनी काही खास प्लॅन ऑफर करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला ते व्हॅल्यू प्लॅनच्या यादीत सापडतील. हे प्लॅन परवडणाऱ्या किमतीत येतात.

जिओचा १८९ रुपयांचा प्लॅन- जिओचा हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांना कॉलिंग, एसएमएससह डेटादेखील हवा आहे. याशिवाय, तुम्हाला या रिचार्ज प्लॅनमध्ये अतिरिक्त फायदे देखील मिळतील. जिओच्या १८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्हाला एकूण २ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतात.

जिओचा ४४८ रुपयांचा प्लॅन- ज्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवा हवी, आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे. म्हणजेच, तुम्हाला या प्लॅनसह डेटा मिळणार नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वतंत्रपणे रिचार्ज करून डेटा वापरू शकता.

या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि १००० एसएमएस मिळतात. या रिचार्जमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळते. या रिचार्जमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओएआय क्लाउडचा अॅक्सेस देखील मिळेल.

जिओचा १७४८ रुपयांचा प्लॅन- जिओचा हा प्लॅन फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवा देतो. ज्यांना दीर्घकाळासाठी स्वस्त रिचार्ज हवा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला ३३६ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि ३६०० एसएमएस येतात. यामध्ये तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओएआय क्लाउडचा अॅक्सेस मिळतो.