स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; 6 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा जबरदस्त स्मार्टफोन

By सिद्धेश जाधव | Published: March 8, 2022 06:46 PM2022-03-08T18:46:02+5:302022-03-08T18:49:36+5:30

iQOO काही दिवसांपूर्वी आपली नवीन फ्लॅगशिप सीरिज भारत सादर केली होती. या सीरिजमधील iQOO 9 SE खूप कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देत आहे. आता या फोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे.

iQOO 9 SE स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 33,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी मॉडेलची किंमत 37,990 रुपये आहे.

iQOO 9 SE स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाच फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.

प्रोसेसिंगची जबाबदारी Snapdragon 888 चिपसेट सांभाळतो. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड फनटच ओएसवर चालतो.

iQOO 9 SE स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2MP मोनो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा सेन्सर मिळेल.

iQOO 9 SE स्मार्टफोनमधील 4,500mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कंपनी या फोनवर 3 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. हा डिस्काउंट ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर मिळत आहे. तसेच जुना फोन एक्सचेंज करून 3 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे एकूण 6 हजार रुपयांची सूट मिळेल.