Instagram चे नवीन शॉपिंग फीचर Drops, खरेदी करू शकता नवीन प्रोडक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:46 PM2021-05-28T20:46:33+5:302021-05-28T21:00:25+5:30

Instagram : Instagram चे हे फीचर या मार्केट टेक्निकलमध्ये काम करेल.

Instagram आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन शॉपिंग फीचर आणत आहे. कंपनीने याला drops नाव दिले आहे. drops मुळे ब्रांड्स त्यांच्या नवीनतम लाँच प्रोडक्ट्सची जाहिरात करू शकतील.

Instagram drops वर ब्रांड्स त्यांच्या आगामी प्रोडक्ट्स सुद्धा टीज करू शकणार आहेत. drop टर्म streetwear फॅशन सीनमध्ये बरेच लोकप्रिय आहे. याठिकाणी प्रोडक्ट्सला लिमिटेड क्वांटिटीमध्ये रिलीज केले जातात.

Instagram चे हे फीचर या मार्केट टेक्निकलमध्ये काम करेल. TechCrunchच्या रिपोर्टनुसार Instagram वर drop शॉपिंग सेक्शनमध्ये उपलब्ध होईल. हे फीचर exclusive आणि लिमिटेड प्रोडक्ट्ससाठी असेल, असे याबाबत सांगण्यात आले आहे.

हे फीचर या महिन्यात Instagram वर आणले जात आहे. या फीचरमुळे युजर्स लेटेस्ट लाँच पाहू शकतील आणि खरेदी करण्यास सक्षम असतील. Instagram आगामी प्रोडक्ट्ससाठी रिमाइंडर सुद्धा देईल. यामुळे युजर्स त्या प्रोडक्ट्ससाठी साइन अप देखील करू शकतात.

याबाबत जे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत, त्यामध्ये लोकप्रिय ब्रांड्स जसे की, Charlotte Tilbury, Adidas आणि Sephora ला नवीन लाँच प्रोडक्ट्स आणि आगामी प्रोडक्ट्सला टीज करताना पाहिजे जाऊ शकते.

जे प्रोडक्ट्स रिलीज नाही झाले नाहीत, याबाबत रिमाइंडर सेट करण्याचाही ऑप्शन देण्यात आला आहे. याआधी Instagram ने 2019 मध्ये रिमाइंडर फीचर लाँच केले होते.

रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हे फीचर drops साठीही उपयुक्त ठरेल. यामध्ये विविध कॅटगरीचे ब्रांड्ससारखे फॅशन, ब्युटी आणि streetwear प्रोडक्ट रिमाइंडरचा वापर करत आहेत.

Instagram drops फीचरमुळे ग्राहक एकाच ठिकाणी नवीनतम आणि आगामी प्रोडक्ट्स सहज शोधू शकतात. हे फीचर सध्या अमेरिकेत अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.