कसं काम करणार 5G हाय-स्पीड नेटवर्क टेक्नॉलॉजी?, जाणून घ्या हरेक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:14 AM2020-03-10T11:14:41+5:302020-03-10T11:20:43+5:30

गेल्या वर्षी व्यावसायिकदृष्ट्या 5G नेटवर्क लवकरच ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. दक्षिण कोरिया, अमेरिका, चीन आणि इतर युरोपियन देशांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या 5G हाय-स्पीड नेटवर्कचं अनावरण करण्यात आलं होतं.

तसेच 2020पर्यंत हे 5जी नेटवर्क मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा मानस आहे. 5 जी नेटवर्क हे 4जीच्या तुलनेत दहा पटीनं अधिक स्पीडनं डाटा ट्रान्सफर करणार आहे.

एखादा सिनेमा डाऊनलोड करायला जिथे तुम्हाला 25 ते 30 मिनिटं लागतात, तिथेच या 5जी नेटवर्कवर काही सेकंदांमध्ये सिनेमा डाऊनलोड करता येणार आहे.

तसेच अल्ट्रा एचडी क्वालिटीच्या व्हिडीओ कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. या स्मार्ट डिवाइसमध्ये जबरदस्त कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे आपलं आयुष्याही आणखी फास्ट होणार आहे.

5जी म्हणजेच पाचव्या पिढीचं हे नेटवर्क टेक्नॉलॉजी फक्त चांगली कनेक्टिव्हिटी देणार नाही, तर आपली जीवनशैली आणखी रोमांचक होणार आहे.

5G नेटवर्क मुख्यतः चार पद्धतीच्या फ्रिक्वेंसी Non-standalone 5G (NSA-5G), standalone 5G (SA-5G), Sub-6 GHz आणि mmWaveवर काम करते. कोणत्याही माध्यमातून अशा चार स्पेक्ट्रम पद्धतीनं 5जी नेटवर्क युजर्सला डिवाइसपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं.

याला बेसिक 5G नेटवर्क म्हटलं जातं. सुरुवातीला नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर्स स्पेक्ट्रमच्या माध्यमातून युजर्सला 5जी नेटवर्क उपलब्ध करून देणार आहेत.

जगभरातल्या अनेक देशांनी ही यंत्रणा स्वीकारलेली असून, स्पेक्ट्रम जुन्या 4G एलटीई नेटवर्कवर रिलाय करता येत नाही. त्यामुळेच 5G नेटवर्क हे स्वतंत्र्यरीत्या उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

हे मिड बॅन्ड 5 जी स्पेक्ट्रम सांगितले आहे. नेटवर्क फ्रिक्वेन्सी 6GHzपासून कमी असते. चीनसह अनेक देशांमध्ये याचा वापर केला जातो.

याला हाय बॅन्ड 5 जी नेटवर्क फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. यात 24GHzच्या फ्रिक्वेन्सीचा वापर केला आहे, त्यापेक्षा जास्त बँडविथ मिळतं. यात डेटा स्पीड 1 जीबीपीएसपर्यंत मिळतो.

4जीला 5 जी नेटवर्कमध्ये अपग्रेड करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या डायनामिक नेटवर्क वापरत आहेत. तंत्रज्ञ एनएसए 5जी स्पेक्ट्रमशी संबंधित असून, यात दोन रेडिओ रिलायन्स जिओ आणि एअरटेल पहिल्यांदा ही सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. सध्या त्याचीच चाचपणी केली जात आहे.