आयुष्यभर मोफत मिळेल वीज! घरासाठी वापरा फक्त 443 रुपयांचं हे खास डिव्हाईस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 09:31 AM2023-02-21T09:31:39+5:302023-02-21T09:46:45+5:30

Electricity bill will be free : आता बाजारात सौरऊर्जेवर चालणारी विविध प्रकारची गॅजेट्स उपलब्ध आहेत. हे गॅजेट्स आपण घरासाठीही वापरू शकता. यांची किंमतही एवढी स्वस्त आहे, की तुम्हाला आश्चर्य वाटेल.

वीज हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्याला साधारणपणे सर्वच गोष्टींसाठी वीज लागते. पण अनेक वेळा वीजेचे बील आपले टेन्शन वाढवते. आपणही वीज बिलाचे टेन्शन घेत असाल, तर आता ते घेण्याची गरज नाही. आज आम्ही आपल्याला एका अशा उपकरणासंदर्भात माहिती देत आहोत, ज्यामुळे आपल्याला एक रुपयाही वीज बिल भरावे लागणार नाही.

आता बाजारात सौरऊर्जेवर चालणारी विविध प्रकारची गॅजेट्स उपलब्ध आहेत. हे गॅजेट्स आपण घरासाठीही वापरू शकता. यांची किंमतही एवढी स्वस्त आहे, की तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर जाणून घेऊयात...

Waterproof Fence Solar Light Lamp - या गॅजेटचे नाव आहे Waterproof Fence Solar Light Lamp. हे गॅजेट सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेच्या माध्यमाने वीज तयार करते. हा एक ऑटोमॅटिक सोलर पॉवर्ड लाईट आहे. याचा वापर आपल्या घरात कुठेही करू शकता.

महत्वाचे म्हणजे हे गॅजेट वजनाला अत्यंत हलके असून पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. कारण यात लाईट सेन्सर्स लावण्यात आले आहे. अंधार होताच याचे लाईट्स अपोआप ऑन होतात. यात एक बॅटरी आणि एक सोलार पॅनलही मिळते. ज्यामुळे सूर्यापासून मिळणारी उर्जा साठवून ठेवली जाते.

किंमतही कमी - हे डिव्हाईस ऑनलाईन अथवा ऑफलाईन बाजारातूनही खरेदी केले जाऊ शकते. या सोलार लाईटचे नाव Hardoll LED Waterproof Fence Solar Light Lamp असे आहे. हे डिव्हाईस साधारणपणे 443 रुपयांपर्यंत खरेदी केले जाऊ शकते.

उजेड आल्यानंतर आपोआप बंद होईल - अंधार झाल्यानंतर हे डिव्हाईस अपोआप ऑन आणि उजेड आल्यानंतर आपोआप ऑफ होईल. अर्थात आपल्याला वारंवार ऑन-ऑफ करायची गरजही भासणार नाही. हे डिव्हाईस 6 तास चार्ज केल्यानंतर 18 तास वापरले जाऊ शकते.