Google Photos चा फ्री बॅकअप संपतोय, चिंता नको! असा करा फ्रीमध्ये वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 08:45 AM2021-06-01T08:45:19+5:302021-06-01T08:48:55+5:30

Google Photos: Google Photos चा अनलिमिटेड फ्री स्टोरेज आज म्हणजेच १ जूनपासून संपत आहे. आतापर्यंत युझर्सना Google Photos वर कुठल्याही लिमिटशिवाय अनलिमिटेड फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करता येत होते. मात्र आजपासून असे करता येणार नाही.

Google Photos चा अनलिमिटेड फ्री स्टोरेज आज म्हणजेच १ जूनपासून संपत आहे. आतापर्यंत युझर्सना Google Photos वर कुठल्याही लिमिटशिवाय अनलिमिटेड फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करता येत होते. मात्र आजपासून असे करता येणार नाही. Google Photos मध्ये हाय क्वालिटी फोटो बॅकअपला स्टोरेजमध्ये काऊंट केलं जाईल. स्टोरेज वाढल्यावर युझरला पैसे द्यावे लागतील.

याबाबत गुगलने अनेक प्लॅन्स सादर केले आहे. तुम्ही सब्स्क्रिप्शन घेऊन Google Photos साठी स्पेस खरेदी करू शकता. सर्वसामान्य युझर्ससाठी हा एक अतिरिक्त खर्च असेल. मात्र जर तुम्ही Google Photos साठी स्टोरेज मॅनेजमेंट योग्य पद्धतीने केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सब्स्क्रिप्शन घेण्याची कुठलीही आवश्यकता भासणार नाही.

अपडेटेड टर्म्स आणि कंडिशन्सनुसार गुगल अनलिमिटेड फ्री हाय क्वालिटी फोटोंना आपल्या सर्व्हरवर स्टोअर करण्याचा पर्याय देणार नाही. त्यासाठी प्रत्येक गुगल अकाऊंटसोबत १५जीबीचा स्टोरेज दिला जातो. स्टोरेज भरल्यानंतर तुम्हाला फोटो स्टोअर करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. यामध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही यापुढेही Google Photos चा फ्रीमध्ये वापर करू शकता.

फोटोच्या ऑटो बॅकअपला तुम्ही सर्वप्रथम बंद करा. यामध्ये व्हॉट्सअॅप, टेलिग्राममधील फोटोही गुगलमध्ये स्टोअर होत असतात. त्यामुळे हा पर्याय बंद करा. तसेच महिन्यातून एकदा तुम्ही गुगल फोटोजमध्ये जाऊन कुठले फोटो बॅकअप करायचे आहेत आणि कुठले नाही हे मॅन्युअली सिलेक्ट करू शकता.

जीमेलवर अनेकप्रकारचे मेल्स येत असतात. यावर स्पॅम मेलसुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात. मोठ्या प्रमाणात स्पॅम मेल आल्यावर ते स्टोरेजसुद्धा मोठ्या प्रमाणात भरतात. त्यामुळे तुम्ही जीमेलवर स्पॅम मेल्स क्लिअर करू शकता. मेलच्या फ्रिक्वेंसीच्या आधारावर तुम्ही २ ते ३ जीबी अतिरिक्ट वाचवू शकता.

गुगल ड्राइव्हसुद्धा खूप स्टोरेज घेतो. त्यामुळे तुम्ही गुगल ड्राइव्हला एकदा तपासून पाहा. जर तुम्ही कुठली मोठी फाईल यावर ठेवली असेल. तसेच तिचा वापर होत नसेल तर ती डिलीट करा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्टोरेज वाचू शकते.