शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' गॅझेट्समुळे तुमचं घर होणार स्मार्ट होम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 4:33 PM

1 / 7
घर सुंदर ठेवण्यासाठी घरामध्ये नवनवीन वस्तू घेतल्या जातात. सध्याचं जग हे तंत्रज्ञानाचं जग आहे. त्यामुळे घरातही विविध इलेक्ट्रिक उपकरणं असतात. यामुळे घराला मॉर्डन लूक येतोच त्याचबरोबर घर देखील स्मार्ट बनतं.
2 / 7
स्मार्ट होम करण्यासाठी विविध गोष्टींचा घरामध्ये समावेश असणं गरजेच आहे. या गोष्टी घरासाठी उपयुक्त ठरतात. अशाच काही गॅझेट्सबाबत जाणून घेऊया.
3 / 7
घराला स्मार्ट लूक देण्यासाठी प्लाझ्मा नाईट लाईट किंवा स्मार्ट लाईट बल्बचा वापर करा. याचं वैशिष्ट्य म्हणजे ब्राईटनेस आणि कलर मूडनुसार ते मॉडीफाय करता येतात.
4 / 7
गाणी ऐकायला सर्वांनाच आवडतात. त्यामुळे घरामध्ये स्मार्ट स्पीकर ठेवा. स्पीकरच्या मदतीने गाणी ऐकायला मिळतात पण त्यासोबतच घरातील टीव्ही, एसी, लाईट्स आणि कॉल्स कंट्रोल करता येतात.
5 / 7
घराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घराच्या दरवाजामध्ये अथवा लिविंग रूममध्ये सर्व्हिलान्स कॅमेरा असणं गरजेच आहे. हा कॅमेरा टॅबलेट आणि मोबाईलने कंट्रोल करता येतो. तसेच हवा तेव्हा बंद देखील करून ठेवू शकतो.
6 / 7
घरातील लायटिंग कंट्रोल करण्यासाठी स्मार्ट स्विच हा एक उत्तम पर्याय आहे. याची किंमत अधिक असते मात्र याचा अत्यंत फायदा होतो. स्मार्ट स्विचमध्ये मोशन सेन्सर असल्याने ते घरातील लाईट्स कंट्रोल करतात. घरातून बाहेर पडल्यास आपोआप लाईट्स आणि फॅन बंद होतात.
7 / 7
घरामध्ये कनेक्टेड अ‍ॅक्सेसरीज असणं गरजेचं आहे. यामुळे पूर्ण घर कंट्रोल करता येतं. एका खोलीत असून देखील अन्य खोल्यांमध्ये असलेली उपकरणे बंद करता येतात.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानHomeघर