मोबाइलची बॅटरी टिकवून ठेवण्यासाठी हे करा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 01:11 PM2018-04-12T13:11:05+5:302018-04-12T13:11:05+5:30

मोबाइल चार्जिंग होत असताना, मोबाइलवर बोलणे, गेम खेळणे, सोशल मीडियाचा वापर करणे, कटाक्षाने टाळावे. यामुळे एका बाजूने मोबाइल चार्ज होतो, तर दुसरीकडे चार्जिंग कमी होते.

मोबाइल बॅटरी बॅक अप यांचा मर्यादित वापर करावा.

मोबाइलचा अलार्म एकाच वेळचा लावावा. 5-5 मिनिटांचा अलार्म लावल्याने बॅटरी जास्त संपते.

मोबाइल चार्जिंग होत असताना, शक्यतो मोबाइल स्विच ऑफ किंवा एरोप्लेन मोडवर असावा.

5 हजार मिली अॅम्पियर अवर बॅटरीच्या क्षमतेचा मोबाइल वापरणे योग्य आहे.