डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 00:52 IST2025-10-14T00:49:09+5:302025-10-14T00:52:45+5:30
Amazon Sale: सणासुदीच्या काळात जर तुम्ही बजेटमध्ये एक चांगला स्मार्टफोन शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम ०५: या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा ड्युअल एआय कॅमेरा, ५००० एमएएचची बॅटरी, ६.७ इंच एचडी प्लस डिस्प्ले आणि चार वर्षांचे सेक्युरिटी अपडेट्स मिळतात. हा फोन दररोजच्या वापरासाठी परफेक्ट असून अॅमेझॉन सेलमध्ये अघ्या ६ हजार २४९ मध्ये उपलब्ध आहे.
रेडमी ए ४: अॅमेझॉन सेलमध्ये हा फोन ८ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. रेडमी चा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरवर कार्यरत आहे. ५००० एमएएच बॅटरीसह, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज तुम्हाला एक उत्तम अनुभव देईल. या फोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो.
पोको एम ७ 5G: या फोनमध्ये ग्राहकांना ५१६० एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा आहे. शिवाय, यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज. हा फोन अॅमेझॉनवरून ८ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकतात.
रिअलमी सी ७१ 4G: यात ५००० एमएएच बॅटरी, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह ३२ मेगापिक्सेल कॅमेरा मिळतो. तसेच, 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले तुम्हाला स्मूथ अनुभव देईल. हा फोन अमेझॉनवर ७ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
लावा बोल्ड एन प्रो: हा फोनची किंमत ६ हजार ५९९ रुपये आहे. हा फोन ५० मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरासोबत येतो. शिवाय, यात ५००० एमएएच बॅटरी, ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह ६.६७ इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. अॅमेझॉनवर हा फोन ६ हजार ५९९ रुपयांत उपलब्ध आहे.