वर्क फ्रॉम होम करताना 'या' Tech Tips ठरतील फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 16:34 IST2020-03-20T16:26:10+5:302020-03-20T16:34:21+5:30
घरी काम करताना अनेकदा काही समस्यांचा सामना करावा लागतो. वर्क फ्रॉम होम करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे.
ऑफिसमध्ये साधारण 8 ते 9 तास काम केलं जातं. मात्र घरी काम करताना अनेकदा काही समस्यांचा सामना करावा लागतो. वर्क फ्रॉम होम करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया.
भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा यासाठी घरातून काम करण्याची म्हणजेच वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे.
लॅपटॉप किंवा संगणक
घरातून काम करण्यासाठी संगणक किंवा लॅपटॉप असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्या मदतीने घरबसल्या काम करणं सोपं होतं.
इंटरनेट कनेक्शन
ऑनलाईनचा जमाना असल्याने आता सर्वांकडे इंटरनेट असतेच. मात्र घरातून ऑफिसचं काम करण्यासाठी इंटरनेटचा चांगला स्पीड असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इंटरनेटचे उत्तम कनेक्शन असावे.
माऊस
संगणकावर काम करताना माऊसचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र लॅपटॉपवर काम करताना अनेकदा तो नसल्याने अडचण येते. त्यामुळे माऊस असणं महत्त्वाचं आहे.
लॅपटॉप रिसर
डेस्कवर काम करणाऱ्यांसाठी Laptop Riser ही गरजेची गोष्ट आहे. यामुळे स्क्रीन डिस्प्ले हा स्वच्छ आणि Higher दिसतो.
गुगल हँगआऊट
घरातून काम करताना ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांसोबत कामासाठी संपर्क साधणं आवश्यक असतं. Slack आणि Google Hangouts च्या मदतीने संपर्क साधणे सोपे होते.
व्हिडीओ कॉल
काम करताना अनेक गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं असतं. मीटिंगसाठी व्हिडीओ कॉल किंवा कॉन्फरन्स कॉल केल्यास काम करणं अधिक सोपं होईल.
हेडफोन्स
घरातून काम करताना अनेकदा घरातील आवाजाचा त्रास होतो. त्यावेळी हेडफोन्स कानात घालून शांतपणे काम करता येतं. तसेच महत्त्वाचा व्हिडीओ पाहायचा असल्यास हेडफोन्स उपयुक्त ठरतात.
काम करण्यासाठी योग्य जागा
ऑफिसमध्ये काम करताना वर्क स्टेशन देण्यात आलेलं असतं. मात्र घरी सोफा अथवा जमिनीवर बसून काम करावं लागतं. यामुळे काम करण्यासाठी योग्य जागा निवडा.