झटपट इंग्रजी शिकण्यासाठी 'हे' अॅप ठरतील फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 15:45 IST2018-10-29T15:08:01+5:302018-10-29T15:45:30+5:30

इंग्रजी ही भाषा आता सर्वत्र सर्रास वापरली जाते. शाळा, कॉलेज, हॉटेल, ऑफीस या सर्व ठिकाणी इंग्रजीच बोललं जातं. मात्र अनेकांना ही भाषा येत नसल्याने इंग्रजीची भीती वाटते. पण घाबरू नका असे काही अॅप आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही लवकर इंग्रजी शिकू शकता, बोलू शकता या अॅपबाबत जाणून घेऊया.
Hello English हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून हे अॅप इंटरनेट शिवायही काम करतं. या अॅपच्या माध्यमातून 23 वेगवेगळ्या भाषेत तुम्ही इंग्रजी शिकू शकतात.
Learn language busuu या अॅपच्या माध्यमातून सुरुवातीपासून इंग्रजी शिकणाऱ्या व्यक्तीला अत्यंत सोप्या भाषेत लवकर इंग्रजी शिकता येईल. हे अॅप इंग्रजी भाषेत लिहिण्याची आणि बोलण्याची शैली सुधारते.
Babbel learn languages हे अॅप युजर्सचे साध्या सोप्या इंग्रजी भाषेचा वापर करून संभाषण कौशल्य सुधारते. तसेच या अॅपमुळे इंग्रजी भाषेतील शब्दसंचय वाढण्यास मदत होते.
Memrise या अॅपच्या माध्यमातून तुम्ही क्रिएटीव्ह पद्धतीने इंग्रजी शिकू शकता. हे अॅप रोज तुम्हाला एका नव्या शब्दाची ओळख करून देईल. तसेच इंग्रजी शब्दांचे उच्चार शिकण्यासाठी हे अॅप उत्तम आहे.
Duolingo हे अॅप इंग्रजी शिकण्यासाठी योग्य आहे. या अॅपवर तुम्हाला केवळ 20 मिनिटं वेळ देणं गरजेचं आहे. या अॅपमध्ये रोज 7 नवीन इंग्रजी शब्द शिकवले जातात. त्यामळे इंग्रजी शिकणे लवकर शक्य होईल.