तुम्ही इयरफोन वापरताय? तर हे वाचायलाच हवं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 12:13 PM2022-09-18T12:13:35+5:302022-09-18T12:22:08+5:30

कानात इयरफोन घालून काम करणं सोयीस्कर तर आहे; मात्र त्याचा अतिवापर केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात...

कानात इयरफोन घालून काम करणं सोयीस्कर तर आहे; मात्र त्याचा अतिवापर केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात...

संभाव्य समस्या इयरफोनच्या अतिवापरामुळे श्रवणशक्ती कमी होणे, बहिरेपणा, निद्रानाश, डोकेदुखी, कानात शिट्टी वा अन्य आवाज येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

ऐकण्याची क्षमता सतत इयरफोन वापरल्याने ऐकण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. ऐकायला कमी येणे ही गंभीर समस्या आहे, त्यामुळे कानाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

गरज असेल तरच - फक्त चांगल्या दर्जाचे इयरफोन वापरा.

इयरफोनऐवजी स्पीकर किंवा हेडफोन वापरण्यास प्राधान्य द्या.

सतत इयरफोन कानांत घालून ठेवण्यापेक्षा, दर अर्ध्या तासानंतर १० ते १५ मिनिटांचा ब्रेक घ्या.

कानात खाज येणे, दुखणे किंवा इतर समस्या असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.

सध्याच्या काळात डिजिटल मीडियात वापरताना इयरफोन ही गरज बनली आहे, मात्र त्याचे शरीरावर परिणाम होतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे