1 / 9Apple ने इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीसोबत सॅटेलाइट करार रद्द केला आहे. अॅपलला आता हा निर्णय महागात पडला आहे. कंपनीला आता आयफोन वापरकर्त्यांना सॅटेलाइट कनेक्टिविटी देण्यात अडचणी येत आहेत.2 / 9२०२२ मध्ये, इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या स्टारलिंकने आयफोनला १८ महिन्यांची विशेष उपग्रह कनेक्टिव्हिटी ऑफर केली.3 / 9यासाठी अॅपलला ५ अब्ज डॉलर्सचे आगाऊ पैसे द्यावे लागले. त्यानंतर, ही सेवा सुरू ठेवण्यासाठी अॅपलला दरवर्षी १ अब्ज डॉलर्स द्यावे लागणार होते.4 / 9जर अॅपलने ही ऑफर नाकारली तर ते काही टेलिकॉम कंपन्यांसोबत भागीदारी करून अशाच प्रकारच्या सेवा देणार असल्याचा इशारा इलॉन मस्क यांनी अॅपलला दिला होता.5 / 9अॅपलने त्यांची ही ऑफर स्वीकारली नाही, त्यानंतर मस्क यांनी स्टारलिंकची सेवा टी-मोबाइलच्या नेटवर्कमध्ये इंटीग्रेट केली.6 / 9इलॉन मस्क यांची ऑफर नाकारल्यानंतर, स्पेसएक्सने अॅपलच्या सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीवर परिणाम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आधी, त्यांनी फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला ग्लोबलस्टारचा स्पेक्ट्रम वापरण्याचा अर्ज रद्द करण्याची विनंती केली.7 / 9आयफोनमध्ये इमर्जन्सी एसओएस व्हाया सॅटेलाइट सारख्या फिचरसाठी अॅपलने ग्लोबलस्टारमध्ये १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. मस्क यांच्या कंपनीमुळे अॅपल स्वतःची उपग्रह सेवा सुरू करू शकले नाही. 8 / 9दुसरीकडे, ग्लोबलस्टारकडे मर्यादित संख्येत उपग्रह असल्याने, अॅपल आता इकोस्टार आणि बोईंग सारख्या कंपन्यांसोबत त्यांची उपग्रह कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी भागीदारी करत आहे.9 / 9अॅपल आणि स्पेसएक्स यांच्यात सध्या एक करार झाला आहे. दोन्ही कंपन्यांनी नवीन आयफोनमध्ये स्टारलिंकची सॅटेलाइट सेवा देण्यास सहमती दर्शविली आहे. दोन्ही कंपन्यांमधील हा करार काही महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याद्वारे, दोन्ही कंपन्या सेल्युलर नेटवर्क उपलब्ध नसलेल्या भागात वापरकर्त्यांना सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी देतील, असा दावा करण्यात आला आहे.