iPhone 12 झाला स्वस्त! अवघ्या २४,९०० रुपयांत खरेदी करा, जाणून घ्या संपूर्ण डील...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 03:58 PM2022-03-14T15:58:22+5:302022-03-14T16:01:46+5:30

Apple iPhone 12 Discount: जर तुम्ही iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला iPhone 12 वर आकर्षक ऑफर मिळत आहेत. हा फोन तुम्ही 24,900 रुपयांना खरेदी करू शकता. कसं ते जाणून घेऊयात..

जर तुम्ही Apple iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर iPhone 12 वर चांगली ऑफर आहे. जरी, हा स्मार्टफोन आता एक वर्षाहून अधिक जुना असला, तरीही परवडणाऱ्या किमतीत मिळणं ही एक चांगली डील आहे. हा स्मार्टफोन तुम्ही अनेक अँड्रॉईड फोनपेक्षाही कमी किमतीत खरेदी करू शकता.

कंपनीने 2020 मध्ये iPhone 12 लाँच केला होता. त्याची किंमत 79,900 रुपये इतकी होती. आता iPhone 13 लाँच झाल्यानंतर त्याची किंमत कमी केली आहे.

सध्या iPhone 12 ची मूळ किंमत 65,900 रुपये आहे, परंतु तुम्ही हा फोन 24,900 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. Appleचा प्रीमियम रिसेलर Aptronix या फोनवर उत्तम ऑफर देत आहे, त्यानंतर तुम्ही इतक्या कमी किंमतीत तो खरेदी करू शकता.

तुम्हाला iPhone 12 वर सूट, कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर मिळत आहे. म्हणजेच या सर्वांमुळे तुमचे ४१ हजार रुपये वाचू शकता. चला जाणून घेऊया या डीलची माहिती.

Aptronix या हँडसेटवर Rs.9,900 चा फ्लॅट डिस्काउंट देत आहे, ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्डची गरज नाही. तसंच कोणतेही कूपन्स घेण्याचीही गरज नाही. या डिस्काउंटनंतर iPhone 12 च्या 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 56 हजार रुपये होईल. आता जर तुम्ही ICICI बँक, कोटक बँक किंवा SBI कार्डधारक असाल तर तुम्हाला 5000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. म्हणजेच याचीही किंमत जोडली तर हा फोन 51 हजार रुपयांचा होतो.

ऑफर इथंच संपत नाही. Aptronix या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील देत आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करू शकता. जर तुम्ही iPhone 11 ला Aptronix सोबत एक्सचेंज केले तर तुम्हाला त्यावर 23,100 रुपये एक्सचेंज व्हॅल्यू मिळेल. अर्थात, यासाठी तुमचा iPhone 11 चांगल्या स्थितीत असणंही गरजेचं आहे.

तसेच, Aptronix तुम्हाला 3000 रुपयांचा बोनस ऑफर करत आहे, त्यानंतर जुन्या फोनचे मूल्य 23,100 रुपयांवरून 26,100 रुपयांपर्यंत वाढते. जर तुम्ही आता फोनच्या मूल्यातून एक्सचेंजची रक्कम वजा केली, तर एकूण मूल्य 24,900 रुपयांपर्यंत पोहोचते. अशा प्रकारे तुम्ही हा फोन सर्वात स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता.

Aptronix कडून वापरकर्त्यांना iPhone 12 च्या खरेदीवर 5000 रुपयांचे ई-वाउचर ऑफर केले जात आहे. मात्र, हे ई-व्हाउचर नेमके कसे वापरता येणार याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. महत्वाची बाब म्हणजे ही ऑफर केवळ ऑफलाइन उपलब्ध असेल आणि फक्त दिल्ली NCR साठी आहे.