शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Amazon चा Apple Days Sale सुरू, iPhone वर मिळतोय 14000 रूपयांपर्यंत डिस्काऊंट, पाहा डिटेल्स

By जयदीप दाभोळकर | Published: February 13, 2021 6:50 PM

1 / 10
जर तुम्हाला स्वत:साठी किंवा कोणाला गिफ्ट करण्यासाठी iPhone विकत घेण्याचा प्लॅन करत असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम वेळ आहे.
2 / 10
सध्या Amazon नं Apple Days Sale ची सुरूवात केली आहे. हा सेल १७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
3 / 10
या सेल मध्ये कंपनी iPhone 12 Mini, iPhone 11 Pro series, iPhone 7 सह अनेक प्रोड्क्ट्सवर ऑफर देत आहे. पाहुया कोणत्या प्रोडक्टवर किती मिळतोय डिस्काऊंट.
4 / 10
iPhone 12 मिनी तुम्ही Amazon च्या Apple Days Sale मध्ये 64,490 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर Amazon कडून 5,410 रुपयांची सूट देण्यात येत आहे.
5 / 10
याव्यतिरिक्त आयफोन 11 प्रो को 79,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना देण्यात येत आहे.
6 / 10
सेलदरम्यान एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनाही Amazon कडून अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे.
7 / 10
या सेलमध्ये ग्राहकाकडे एचडीएफसी बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर त्यांना आयफोनच्या खरेदीवर 9 हजार रूपये ते 14 हजार रूपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. परंतु ही सूट ग्राहकांना 14 फेब्रुवारीपर्यंतच मिळणार आहे.
8 / 10
Apple डेझ दरम्यान ग्राहकांना iPad मिनीवर 6,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात येत आहे.
9 / 10
तर दुसरीकडे जर तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचं डेबिट अथवा क्रेडिट कार्ड असेल तर त्यावर अतिरिक्त 3 हजार रूपयांची सूट मिळणार आहे.
10 / 10
तर या सेलमध्ये कंपनी ईयरपॉड्सवरही 2 हजार रूपयांपर्यंतची सूट देत आहे. हे ईयरपॉड्स ग्राहकांना 12,490 रूपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतात.
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनApple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन