Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:00 IST2025-09-23T11:55:14+5:302025-09-23T12:00:38+5:30

Aadhaar App : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे सीईओ भुवनेश्वर कुमार यांनी नवीन आधार अ‍ॅपची घोषणा केली आहे. 'नवीन अ‍ॅपची डेमो चाचणी पूर्ण झाली आहे आणि ते लवकरच लाँच केले जाईल', असे सांगण्यात आले आहे.

आधार कार्ड अपडेट करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आपल्याला रांगेत थांबण्याची गरज नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता एक नवीन अॅप लाँच करत आहे.

UIDAI चे सीईओ भुवनेश्वर कुमार यांनी स्वतः या अॅपबद्दल माहिती दिली. त्यांनी अॅपबाबत माहिती दिली. 'तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया देखील यावरुन करता येईल असे सांगण्यात येत आहे.

UIDAI चे सीईओ भुवनेश्वर कुमार एका मुलाखतीमध्ये या अॅपबाबत माहिती दिली. 'नवीन आधार अॅप तयार आहे आणि लवकरच लाँच केले जाईल. लाँच टाइमलाइनचा संदर्भ देत ते म्हणाले की, नवीन आधार अॅप २-३ महिन्यांत लाँच केले जाईल. नवीन आधार अॅपची चाचणी पूर्ण झाली आहे आणि डेमो पूर्ण झाला आहे.

'या नवीन अॅपमध्ये ओळख शेअरिंग फीचरचा समावेश असेल. आधार कार्ड धारकांची परवानगी घेतल्यानंतर ही माहिती शेअर केली जाईल. सध्या, लोकांना आधारशी संबंधित माहिती शेअर करण्यासाठी फोटोकॉपी बाळगाव्या लागतात. नवीन अॅपसह, हे काम डिजिटल पद्धतीने केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

'आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर बदलणे सोपे आहे, पण ती एक संवेदनशील बाब देखील आहे. आधार कार्डवरील नवीन मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी, तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. केंद्रात, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यापूर्वी तुम्हाला प्रथम बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करावे लागेल.

बनावट आधार कार्डांबद्दल भुवनेश्वर कुमार यांनी स्पष्ट केले की, बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी एक विशेष सुविधा आहे.

सर्व आधार कार्डमध्ये क्विक रिस्पॉन्स कोड (क्यूआर कोड) असतो, जो योग्य आधार कार्ड माहिती मिळविण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो.