Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:56 IST2025-09-24T16:48:17+5:302025-09-24T16:56:49+5:30
Smartphones Under 10000: १० हजारांपेक्षा कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली माहिती आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम ०६ 5G: या फोनमध्ये ६.७-इंचाचा एचडी+ पीएलएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला. तर, ५० एमपी + २ एमपी रियर कॅमेरा आणि ८ एमपी फ्रंट कॅमेरा मिळतो. शिवाय, यात ५००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली. हा फोन अॅमेझॉनवर ७ हजार ४९९ रुपयांना उपलब्ध आहे
पोको एम७ 5G: पोको एम७ 5G मध्ये ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि ५१६० mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर, ५० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा मिळतो. हा फोन अॅमेझॉनवर ८ हजार ४९९ रुपयांत उपलब्ध आहे.
रेडमी ए४ 5G: फोनमध्ये ६.८८-इंचाचा एचडी+ १२० हर्ट्झ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, ५० एमपी प्रायमरी कॅमेरा आणि ५ एमपी फ्रंट कॅमेरा मिळतो. रेडमी ए४ 5G ५१६० एमएएचची बॅटरी मिळते. हा फोन अमेझॉनवर ७ हजार ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर हा फोन ८००० रुपयांना उपलब्ध आहे.
लावा बोल्ड एन१ प्रो: या मॉडेलमध्ये ६.६७-इंचाचा एचडी+ डिस्प्ले (१२० हर्ट्झ), ५० एमपी ट्रिपल रिअर कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरी आहे. हा फोन अमेझॉनवर ६,५९९ रुपये आणि फ्लिपकार्टवर ७,९४८ रुपये किमतीत उपलब्ध आहे.
विवो टी४ लाईट 5G: या फोनमध्ये ६०००mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. तर, ५० मेगापिक्सेल + २ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. इ कॉमर्स वेबसाइटवर हा फोन ९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एफ ०६ 5G: सॅमसंगचा हा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला हा फोन फ्लिपकार्टवर ७ हजार ४९९ रुपयांत उपलब्ध आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी प्रेमींसाठी, यात ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. याव्यतिरिक्त, या डिव्हाइसमध्ये ५,००० एमएएचची मोठी बॅटरी आहे.
रेडमी १४सी 5G: या फोनच्या मागील पॅनलवर ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला. यात ५,१६० एमएएच बॅटरी असून ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. हा फोन अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ८ हजार ९९९ रुपयांना विकला जात आहे.