By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:09 IST
1 / 9क्रिकेट आणि ग्लॅमर या दोघांचे नाते खूपच जुने आहे. त्यातच हल्ली क्रिकेट मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमधली काही चेहरे झटपट व्हायरल होतात आणि चर्चेत येतात.2 / 9अलीकडेच वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध अमेरिका आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ सामन्यादरम्यान भारतीय संघाची जर्सी घातलेली एक मिस्ट्री गर्ल चर्चेत आली.3 / 9ही मिस्ट्री गर्ल म्हणजे मुंबईतील अभिनेत्री, डान्सर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर तन्वी गडकरी. तिचे लाइव्ह सामन्यातील काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.4 / 9सूर्यकुमार यादवने जेव्हा मोठा फटका खेळला होता, त्यावेळी ती कॅमेरा समोर डान्स करताना दिसली, त्यामुळे हा व्हायरल व्हिडिओ जास्त व्हायरल होताना दिसत आहे.5 / 9तन्वीनेदेखील स्वतः हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने स्टेडियममधील पहिला क्रिकेट सामना एन्जॉय करत असल्याचे कॅप्शन दिले आहे.6 / 9तन्वीने अभिनय कारकिर्दीची सुरुवात वेब सिरीज आणि म्युझिक व्हिडिओतून केली. कॅम्पस बीट या वेब सिरीजमध्ये रिहानाच्या भूमिकेतून तिला स्वत:ची ओळख मिळाली.7 / 9याव्यतिरिक्त, तिने जमनापार या वेब सिरीजमध्येही काम केले आहे आणि अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये तिच्या डान्सिंग स्किल्स दाखवल्यात. ज्यामुळे ती लोकप्रिय झाली आहे.8 / 9तन्वीला तिच्या डान्स व्हिडिओ, लाईफस्टाईल पोस्ट आणि ब्रँड कोलॅबोरेशन कंटेंटमुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असल्याने, तिची लोकप्रियता वाढत आहे.9 / 9तन्वीला तिच्या डान्स व्हिडिओ, लाईफस्टाईल पोस्ट आणि ब्रँड कोलॅबोरेशन कंटेंटमुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असल्याने, तिची लोकप्रियता वाढत आहे.