शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

West Bengal Results 2021: सोशल मीडियात 'बंगाल'वरून कहर; नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हीटीला बहर, एकापेक्षा एक मीम्स शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 4:26 PM

1 / 9
केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे बंगालमधील निवडणूक चुरशीची होऊन भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा दावा करण्यात येत होता. पण निकालांमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील भाजपाने दोनशेपार मुसंडी मारली.
2 / 9
ममता दीदींनी निकालांमध्ये बाजी मारताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे.
3 / 9
प्रचाराच्या काळात काहीजणांना ममता बॅनर्जींचे मीम्स तयार करून व्हायरल केले होते. आता या मीम्सला सोशल मीडियावर पलटवार केला जात आहे.
4 / 9
पराभूत पक्षाांसाठी हे खास मीम्स तयार करण्यात आले असून आता सोशल मीडियावर या मीम्सना भन्नाट प्रतिसाद मिळत आहे.
5 / 9
दरम्यान नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा पराभव केला आहे.
6 / 9
निवडणूकीचे निकाल जसजसे जाहिर होऊ लागले तसतसं विरोधी पक्ष नेत्यांनी, तसंच वेगवगेळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यानी ममता दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
7 / 9
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत ममतांना शुभेच्छा दिल्या आहेत. अरविंद केजरीवाल म्हणाले हा जमीन हलवणारा विजय आहे. यासाठी शुभेच्छा. काय सामना केला. पश्चिम बंगालच्या लोकांनाही शुभेच्छा.
8 / 9
'तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात', असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.
9 / 9
या निवडणुकीसाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार करत होते. पण याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही. ममता बॅनर्जी यांनी भाजपचा सुपडासाफ केल्याचं दिसून आलं आहे.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१memesमिम्सSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेMamata Banerjeeममता बॅनर्जी