शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२० या वर्षात इंटरनेट सेवा खंडीत केल्यानं कोट्यवधी लोकांना त्रास, भारत पहिल्या क्रमांकावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 8:57 PM

1 / 7
2020 या वर्षात जगभरात २९ देशांत जाणूनबुजून कमीत कमी १५५ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली किंवा इंटरनेटचा स्पीड कमी करण्यात आला होता.
2 / 7
डिजिटल राइट ग्रूप एक्सिस नाऊ यांनी याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालानुसार २०२० या वर्षात भारतात सर्वाधिकवेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
3 / 7
भारतात २०२० या वर्षात १०९ वेळा इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. यात सर्वाधिक जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
4 / 7
भारतापाठोपाठ म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांमध्येही इंटरनेट सेवा बंद झाली होती.
5 / 7
म्यानमार हा देश सर्वाधिक कालावधीसाठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेला देश ठरला आहे. म्यानमार २०१९ पासूनच इंटरनेट सेवा खंडीत करण्याचं प्रकरण सुरू झालं ते अगदी २०२० सालापर्यंत सुरू होतं.
6 / 7
बांगलादेशात रोहिंग्यांच्या कॅम्प परिसरात ४१५ दिवसांपर्यंत इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती.
7 / 7
इथिओपियामध्ये २ आठवड्यांपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. एकट्या इथिओपियामध्ये सलग दोन आठवडे तब्बल १० कोटी लोक इंटरनेटविना होते.
टॅग्स :InternetइंटरनेटSocialसामाजिकFacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Viralसोशल व्हायरल