शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 11:07 PM

जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे एअर फोर्सच्या ताफ्यावर शनिवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.

पुंछ: जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे एअर फोर्सच्या ताफ्यावर शनिवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ५ जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते आणि त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. पण, आताच हाती आलेल्या बातमीनुसार हे पाचपैकी एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर येत आहे. यापैकी एका जवानाची प्रकृती अजूनही गंभीर असून तिघांची प्रकृती ठिक असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.  या हल्ल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. शाहसीतार जवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आल्याचे सुरक्षा दलातील अधिकाऱ्याने सांगितले. पुंछमध्ये दहशतवाद्यांचे पुन्हा एकदा भ्याड कृत्य समोर आले. सुरणकोट गावात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या दोन वाहनांवर गोळीबार केला. या घटनेत हवाई दलाचे ५ जवान जखमी झाले होते. गोळीबाराची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले की, जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथे वायुसेनेच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी फायरिंग केल्याची घटना धक्कादायक आणि निंदनीय आहे.  ह्या हल्ल्यात आपले अनेक जवान जखमी झाल्याची बातमी आहे. त्या जवानांना लवकरात लवकर आराम पडो, अशी देवाचरणी प्रार्थना करतो. हल्लेखोरांना कणखर प्रत्युत्तर मिळेल, अशी अपेक्षा करतो. आपल्या सैन्यदलावर हल्ला झालाच कसा, ह्याची सखोल चौकशी व्हावी; अशी केंद्र सरकारकडे मागणी करतो.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी