ओठांचा कॅनव्हाससारखा वापर करून पेंटींग, अद्वितीय कलाकारीचा अद्भूत नजारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 14:59 IST2019-05-17T14:50:51+5:302019-05-17T14:59:25+5:30

तुम्ही जर इन्स्टाग्रामवर गेलात तर तुम्हाला कितीतरी मेकअप आर्टिस्टचे फोटो बघायला मिळतील, ज्यांनी त्यांच्या शरीराचा कॅनव्हाससारख वापर केलाय. अशीच एक मेकअप आर्टिस्ट आहे Ryan Kelly. हिने तिच्या ओठांचा वापर कॅनव्हाससारखा करून अनेक सुंदर पेटिंग ओठावर काढल्या आहेत. तिने मेकअपला एका वेगळ्याच लेव्हलचा नेऊन ठेवलं आहे. Kelly ही Maryland येथील मेकअप आर्टिस्ट आहे. तिने केलेले लिप आर्टचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही कलाकारी पाहून तुम्ही थक्क व्हाल हे नक्की. (Image Credit : www.boredpanda.com)





































