बोंबला! सुंदर दिसण्यामुळे डेटिंग अ‍ॅपने केलं बॅन; २१ वर्षीय मॉडेलने सांगितले की....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 12:57 PM2020-11-11T12:57:21+5:302020-11-11T13:14:33+5:30

२१ वर्षांची इंस्टाग्राम मॉडेल लूना बेना हिला आपल्या सुंदरतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. लूनाने दावा केला आहे की, प्रसिद्ध डेटिंग अॅप टिंडरने आकर्षक आणि सुंदर अकाऊंटमुळे बॅन केलं आहे. त्यामुळे ही महिला सोशल मीडियावर आपली बाजू मांडत आहे.

लूनाने सांगितले की, ''२०१७ मध्ये मी या अॅपवर रजिस्ट्रेशन केलं. काही दिवसांनी सोशल मीडियावरील काही युजर्सनी फोटो चोरून फेक अकाऊंट्स बनवायला सुरूवात केली. फक्त टिंडर नाही तर फेसबूकवरही फोटो चोरून मोठ्या प्रमाणावर फेक अकाऊंट्स बनवले आहेत. माझ्या फोटोजचा वापर करत हजारो फॉलोअर्स मिळवले आहेत.''

इतकंच नाही तर सुंदर दिसण्यामुळे लूना टिंडरवर धमक्यासुद्धा येत होत्या. या फेक प्रोफाईल्सवरून मेसेज येत होते. तेव्हा ब्लॉक केलं जात होतं. तिच्या फोटोंचा आणि प्रोफाईलचा वापर करून लोक खूप कमाई करत होते.

लूनाचे हजारो फेक अकाऊंट्स असल्यामळे टिंडर अॅप लूनाचे खरं अकाऊंट आणि इतर फेक अकाऊंट यातील फरक ओळखू शकत नाही. जेव्हा लूना टिंडरवर स्वतः अकाऊंट ओपन करते. तेव्हा फेक अकाऊंट समजून बॅन केलं जातं.

लूना या अॅपचा वापर करून अनेकदा डेटवर सुद्धा गेली होती. टिंडरवर बॅन होण्याआधी तीने एका माणसाला डेट केले होते. लूनाने सांगितले की, मी माझ्या मित्रांना ओळखते त्यामुळे सुरक्षेबाबत कोणतीही चिंता करण्याचे काहीही कारण नाही. मला फोटोग्राफी आणि मॉडेलिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.

लूना टिंडर आणि फेसबूकवर नाही तर इंस्टाग्रामवरही खूप प्रसिद्ध आहे. आतापर्यंत १ लाख फॉलोअर्स लूनाचे आहेत. इंन्स्टाग्रामवर कमाई करण्याशिवाय ती आपल्या ओन्ली फॅन्स अकाऊँटवरूनही पैसे कमावते.