Shocking! आंघोळ करताना बाथरूममध्ये महिलेला दिसला गुप्त कॅमेरा, पतीच्या कृत्यामुळे झाली हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 03:13 PM2021-08-21T15:13:37+5:302021-08-21T15:23:22+5:30

महिलेने तिची स्टोरी शेअर करत लिहिले की, पतीच्या या कृत्यामुळे तिला फार लाजिरवाणं वाटतंय. तिला हे समजत नाहीये की, त्याने असं का केलं असावं?

जगभरात पती-पत्नीत वादाची अनेक विचित्र कारण समोर येत असतात. या कारणांमुळे नाती तुटतात किंवा जोडली जातात. छोट्या छोट्या चुका मजबूत नातं काही सेकंदात नेहमीसाठी तोडतात. अशाच एका महिलेने तिची स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. महिलेने सांगितलं की, पतीने निर्लज्जपणाच्या सर्व सीमा पार केल्या.

या महिलेने नाव गुप्त ठेवून सोशल मीडिया साइट मम्सनेटवर तिचा अनुभव सांगितला. महिलेने सांगितलं की, दोन वर्ष आणि पाच वर्षांचे तिला दोन मुलं आहेत. ती तिच्या पतीसोबत राहते. कोरोना महामारीमुळे पती घरीच राहत होता. ती गृहिणी आहे आणि घरीच मुलांना सांभाळते.

महिलेने सांगितलं की, एक दिवस ती दोन्ही मुलांना पतीकडे सोडून दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली होती. आंघोळ केल्यावर ती तिच्या शरीरावर क्रीम लावत होती. तेव्हाच तिची नजर एका निळ्या रंगाच्या लाइटवर पडली. ती हा लाइट बघून घाबरली. तिने जवळ जाऊन पाहिलं तर तिला धक्काच बसला.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, महिलेने सांगितलं की, बाथरूमच्या एका कोपऱ्यात तिला एक ब्लींक कॅमेरा आढळून आला. जो बघून त्याला धक्का बसला. कारण तिला समजलं होतं की, कॅमेरात तिचं आंघोळ करतानाचं दृश्य रेकॉर्ड झालं. पतीच्या या कृत्यामुळे ती हैराण झाली.

महिलेने सांगितलं की, पतीने हा कॅमेरा पाळिव कुत्र्यावर लक्ष ठेवण्यासाठी खरेदी केला होता. त्यामुळे महिलेला विश्वास बसला की, हे काम पतीनेच केलं आहे. महिला लगेच खाली गेली आणि पतीला विचारलं की, तू माझ्यावर लक्ष ठेवत होता का?

पतीने तिला सांगितलं की, तो तिच्यावर लक्ष ठेवून नव्हता. त्याला त्या कॅमेराची टेस्ट घ्यायची होती की, कॅमेरा निट काम करतो की, नाही. मग महिलेने पतीला त्यातील फुटेज डिलीट करण्यास सांगितलं. ते त्याने केलं. पण या कृत्यासाठी महिलेच्या आई-वडिलांनी पतीला चांगलंच सुनावलं.

महिलेने तिची स्टोरी शेअर करत लिहिले की, पतीच्या या कृत्यामुळे तिला फार लाजिरवाणं वाटतंय. तिला हे समजत नाहीये की, त्याने असं का केलं असावं? सोशल मीडियावर तिची ही पोस्ट पाहिल्यावर लोक महिलेच्या पतीवर राग व्यक्त करत आहेत.

एका यूजरने लिहिले की, तिने लगेच याबाबत पोलिसात तक्रार करायला हवी. कारण हे शक्य आहे की तिचा पती तिचे न्यूड व्हिडीओ साइट्सवर अपलोड करत असेल. तेच एका दुसऱ्या महिलेने लिहिलं की, तिने तिच्या मुलांना या व्यक्तीपासून दूर करावं.