शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंटरनेटवर पहिली पोस्ट काय होती? पहिला ई-मेल अन् पहिला यूट्यूब व्हिडीओ काय होता?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 3:55 PM

1 / 13
इंटरनेट आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झालं आहे. कालच इंटरनेटला ३० वर्ष पूर्ण झालीत. १९८९ मध्ये १२ मार्च रोजी ब्रिटनच्या वैज्ञानिक टिम बर्नर्सने वर्ल्ड वाइट वेब(WWW) चा अविष्कार केला होता. हा शोध किती महत्त्वाचा होता हे आज जगभरात इंटरनेटच्या झालेल्या विस्तारावरून बघायला मिळतं. असं अजिबातच नाहीये की, इंटरनेटने एका दिवसात इतकं यश मिळवलं. हे अनेक वर्षांची मेहनत आणि संघर्षाचं फळ आहे. चला जाणून घेऊ इंटरनेटच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त की, इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा कोणत्या गोष्टी शेअर करण्यात आल्या होत्या.
2 / 13
पहिलं ट्विट - २१ मार्च २००६ रोजी ट्विटरचे को-फाउंडर Jack Dorsey यांनी पहिलं ट्विट केलं होतं. याच्या दहा वर्षांनंतर ३०० मिलियन लोकांकडून वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार झालं होतं.
3 / 13
यूट्यूबवरील पहिला व्हिडीओ - Me at the zoo नावाने असलेला हा (https://www.youtube.com/watch?v=jNQXAC9IVRw) व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेला पहिला व्हिडीओ होता. हा व्हिडीओ यूट्यूबचा को-फाउंडर जावेद करीमने २३ एप्रिल २००५ मध्ये शेअर केला होता.
4 / 13
वर्ल्ड वाइड वेबवर अपलोड केलेला पहिला फोटो - टिम बर्नर्स ली ने १९९२ मध्ये वेबवर पहिला फोटो अपलोड केला होता. हा फोटो रॉक ग्रुप Les Horribles Cernettes चा होता.
5 / 13
इन्स्टाग्रामवर शेअर केलेला पहिला फोटो - इन्स्टाग्रामचा को-फाउंडर Kevin Systrom ने या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहिला फोटो शेअर केला होता. हा फोटो त्याच्या कुत्र्याचा होता. जुलै २०१० ला हा फोटो अपलोड केला होता.
6 / 13
पहिलं वेब पेज - टिम बर्नर्स ली ने १९९१ मध्ये पहिलं वेब पेज इंटरनेटवर शेअर केलं होतं. यात वर्ल्ड वाइब वेबचा वापर कसा करायचा याची माहिती देण्यात आली होती.
7 / 13
पहिलं .Com डोमेन - १५ मार्च १९८५ मध्ये Massachusetts च्या एका कॉम्प्युटर तयार करणाऱ्या कंपनीने symbolics.com नावाने पहिलं डोमेन रजिस्टर केलं होतं. हे आजही जगतालं सर्वात जुनं डोमेन आहे. आजही हे वापरात आहे.
8 / 13
eBay वर विकली गेलेली पहिली वस्तू - १९९५ मध्ये eBay ने त्यांच्या वेबसाइटवर चेक करण्यासाठी त्यावर एका तुटलेल्या लेजर पॉइंट पेनचा सेल लावला होता. हा पेन एका व्यक्तीने १४.८३ डॉलरला खरेदी केला होता.
9 / 13
Amazon वर विकली गेलेली पहिली वस्तू - ३ एप्रिल १९९५ ला Amazon पुस्तकांचा सेल लावण्यात आला होता.
10 / 13
पहिलं सर्च इंजिन - गुगलच्या आविष्काराच्या ८ वर्षांआधी १९९० मध्ये McGill University चा विद्यार्थी Alan Emtage ने आर्ची नावाने एक सर्च इंजिन सुरू केलं होतं.
11 / 13
पहिलं फेसबुक प्रोफाइल - सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुकचं पहिलं प्रोफाइल फेसबुकचा फाउंडर Mark Zuckerberg याचं होतं.
12 / 13
पहिला ई-मेल - १९७१ मध्ये कॉम्प्युटर प्रोगामर Ray Tomlinson ने एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर @ या सिम्बॉलचा वापर करून मेसेज केला होता. हाच पहिला ई-मेल होता.
13 / 13
पहिला Unsolicited Commercial Email (SPAM) - पहिला ई-मेल पाठविल्यानंतर ७ वर्षांनी इंटरनेट एका नव्या बदलाचा साक्षीदार ठरलं. हे होतं कमर्शिअल ई-मेल.
टॅग्स :InternetइंटरनेटSocial Mediaसोशल मीडिया