Coronavirus; समुद्रातील ‘या’ संजीवनी वनस्पतीत कोरोनाला रोखण्याची शक्ती; भारतीय संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 09:20 PM2020-04-12T21:20:43+5:302020-04-12T21:26:48+5:30

कोरोना व्हायरसने जगभरात संकट उभं केलं आहे. आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. बर्‍याच देशांतील शास्त्रज्ञ कोरोनावर उपचार आणि लसीच्या शोधात गुंतले आहेत, परंतु अद्याप एकही यशस्वी झाले नाहीत. पण कोरोनावर समुद्रात आढळणाऱ्या लाल मॉस(शेवाळं) उपचार केले जाऊ शकतात आणि त्याचा प्रसार रोखता येऊ शकतो असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.

हे संशोधन देशातील आघाडीची व्यावसायिक कंपनी रिलायन्सने केले आहे, ज्यामध्ये समुद्रामध्ये सापडलेल्या रेड मॉसपासून कोरोना विषाणूचा बरा करण्याचा दावा करण्यात आला आहे.

सिंक, शौचालय, टँक अशा सर्व वस्तू आपण दररोज वापरत असलेल्या सॅनिटरी वस्तूंमध्ये येतात.

रिलायन्सच्या संशोधनानुसार, समुद्रात सापडलेल्या रेड मॉसमधून एक जैविक रसायन निघतं. या रसायनाची कोटिंग पावडर तयार करून सॅनिटरी वस्तूंवरील संक्रमण रोखण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी म्हणाले होते की, देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता रिलायन्स लाइफ सायन्स या साथीच्या आजारांशी संबंधित तपास आणि संशोधनास पुढे नेण्यास मदत करेल.

रिलायन्सच्या वतीने विनोद नागले, महादेव गायकवाड, योगेश पवार आणि शांतनु दासगुप्ता यांनी हे संशोधन केले आहे. हे सर्व वैज्ञानिक आणि संशोधक रिलायन्सच्या संशोधन आणि विकास केंद्रात काम करतात.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत देशात 8 हजाराहून अधिक संक्रमित रूग्णांची पुष्टी झाली आहे, तर 270 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.