एक असा देश जिथं विज्ञान ठरतं फेल, नदीवर १ तासात हजारवेळा कोसळते वीज!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 04:46 PM2021-02-23T16:46:57+5:302021-02-23T16:56:33+5:30

catatumbo lightning: निसर्गाचं प्रत्येक रहस्य विज्ञानाच्या मदतीनं सोडवता येऊ शकतं असं वैज्ञानिक म्हणतात. २१ व्या युगात आपणही याच मताचे असतो. पण एका देशात निसर्गाचं एक असं गुपित आहे ज्यामागचं कारण आजही वैज्ञानिकांना शोधता येऊ शकलेलं नाही. जाणून घेऊयात...

जगात एक एसा देश आहे जिथं आसमंतात नेहमी वीज कडाडत असते. यामागचं रहस्य आजही वैज्ञानिकांना उलगडता आलेलं नाही. या देशाचं नाव आहे व्हेनेझुएला (Venezuela). अगदी सविस्तर ठिकाण सांगायचं झालं तर व्हेनेझुएलातील कटाटुम्बो नदीजवळील (Catatumbo River) एका तलावावर (Lake) आकाशात नेहमी वीज कडाडत असते.

दक्षिण अमेरिकास्थित व्हेनेझुएलामध्ये घडणाऱ्या या घटनांसमोर विज्ञान देखील फोल ठरतं असा दावा केला जातो. कटाटुम्बो नदीवर वारंवार कोसळणाऱ्या वीजेच्या घटनेला इथं 'कटाटुम्बो लायटनिंग' (catatumbo lightning) असं संबोधलं जातं.

कटाटुम्बो या नदीवर एका तासात तब्बल हजारवेळा वीज कडाडते असं म्हटलं जातं. एका अहवालानुसार पावसाळ्यात तर एका मिनिटात सरासरी २८ वेळा येथे वीज चमकते असं नोंदविण्यात आलं आहे.

व्हेनेझुएलातील या ठिकाणाला आणि निसर्गाच्या अनोख्या रचनेला अनेक नावं देण्यात आली आहे. जिथं वीज कडाडते त्या ठिकाणाला टाटुम्बो लायटनिंग, एव्हरलास्टिंग स्ट्रॉर्म, ड्रामॅटिक रोल ऑफ थंडर असं विविध नावांना ओळखलं जातं. विशेष म्हणजे, सतत वीज कडाडण्यामागचं कारण आजवर शास्त्रज्ञांना शोधता आलेलं नाही.

कटाटुम्बो या रहस्यमय जागेबाबात अनेक दावे देखील केले जातात. या ठिकाणी दरवर्षी २६० वेळा वादळ येतं असा दावा केला जातो. पण याचे कोणतेही पुरावे नाहीत. या दिवसांत संपूर्ण रात्रभर या ठिकाणी वीज कडाडते.

कटाटुम्बो येथे चमकणाऱ्या वीजांचे फोटो दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

परिसरात युरेनियमचं प्रमाण जास्त असल्यानं याठिकाणी वारंवार वीज चमकते असा दावा १९६० साली वैज्ञानिकांना केला होता.

काही वैज्ञानिकांनी येथील वातावरण मिथेनचं प्रमाण खूप असल्यानं वीज कडाडत असल्याचं म्हटलं आहे.

आजवर कोणताही वैज्ञानिक सिद्धांत या नैसर्गिक घटनेबाबत सिद्ध होऊ शकलेला नाही.