वाह, लय भारी! आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन्ही भावांनी हेलिकॉप्टरने नवरीला घरी आणलं; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 03:07 PM2020-11-27T15:07:51+5:302020-11-27T15:20:28+5:30

आजी आजोबा आणि नातवंडाचं नातं वेगळंच असतं. आजी- नातवाच्या प्रेमाची एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन नातवंडानी एक अनोखं काम केलं आहे. लग्न झाल्यानंतर आपल्या सुनांनी हॅलिकॉप्टरने घरी यावं अशी आजीची इच्छा होती. आजीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नातवांनी आपल्या पत्नीला गावात आणण्यासाठी हेलीपॅड तयार केला. ही घटना राजस्थानातील कोटा जिल्ह्यातील आहे.

कोटामध्ये गुरूवारी एका कुटूंबातील नवरा नवरी हेलिकॉप्टरने आले. त्याच्या लग्नात वेगवेगळ्या प्रोटोकॉल्सचे पालन करण्यात आले होते. कोटामधील एका आजीच्या इच्छेसाठी नातवाला आपल्या पत्नीला हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आहे.

अशोक मालव यांच्या कुटूंबातील लग्नात हा नजारा पाहायला मिळाला.

अशोक यांचा मोठा मुलगा पंकज याचे लग्न भवानीपुरातील रहिवासी असलेल्या कोमल सह झाले. तर लहान मुलगा ललित याचे लग्न दिपपुरातील रहिवासी रश्मितीसह झाले.

हे दोन्ही नवविवाहित जोडपे लग्नानंतर लग्नानंतर हेलिकॉप्टरने गाव देवली अरब येथे आले. या ठिकाणी हेलीपॅड तयार करण्यात आला होता. ज्या मॅरेज गार्डनमध्ये लग्न झाले त्या ठिकाणीसुद्धा हेलिपॅड तयार करण्यात आला होता.

अशोक मालव यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आईची इच्छा अशी होती की, ''दोन्ही सुनांना हेलिकॉप्टरमधूनच घरी आणायला हवं. म्हणून आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही दोन्ही सुनांना हेलिकॉप्टरने घरी आणलं.''