मालवण पर्यटन महोत्‍सव 'जल्लोष २०२२' : दांडी समुद्रकिनारी साकारली वाळुशिल्पे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:17 PM2022-05-13T18:17:35+5:302022-05-13T18:20:51+5:30

मालवण नगरपरिषदेच्या वतीने दांडी समुद्रकिनारी येथे आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आजपासून पुढील तीन दिवस हा महोत्सव सुरु राहणार आहे. या महोत्सवा दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

याअंतर्गत वाळुशिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज, शुक्रवारी सकाळपासून स्पर्धकांनी वाळुशिल्पे साकारण्याचे सुबक काम हाती घेतले होते.

आकार घेत असलेली वाळुशिल्पे पाहण्यासाठी पर्यटक आणि बच्चे कंपनीने दांडी समुद्रकिनारी धाव घेतली होती.

दरम्यान, नौकानयन स्‍पर्धा अंतर्गत १८ फुट फायबर बोट वल्हवण्याची स्‍पर्धा घेण्‍यात आली. पर्यटक व स्‍थानिक मच्छिमारांनी नौकानयन स्‍पर्धेचा थरार अनुभवला.