हिवाळा स्पेशल इंस्टंट लोणची! ५ मिनिटांत तयार होणारी ५ चटकदार लोणची, जेवणात येईल चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2025 11:38 IST2025-11-27T11:31:04+5:302025-11-27T11:38:02+5:30

हिवाळ्याच्या दिवसांत खवय्यांची मजा असते. कारण या दिवसांत बाजारात भाज्या भरपूर प्रमाणात असतात. शिवाय या दिवसांत मिळणाऱ्या वेगवेगळ्या भाज्यांचे छान चटकदार लोणचेही करता येते...

असेच काही हिवाळा स्पेशल इंस्टंट लोणच्यांचे प्रकार आपण पाहूया..

या दिवसांत बाजारात गाजर भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे गाजराचं लोणचं या दिवसांत घराघरांमध्ये केलं जातं.

एरवी बरेच जण मुळा खायला नाही म्हणतात. पण मुळ्याचं लिंबाचा रस घालून केलेलं लोणचं मात्र अतिशय चवदार होतं. हे लाेणचं एकदा नक्की ट्राय करून पाहा.

आवळ्याचाही हाच हंगाम असतो. आवळ्याचा मुरांबा, आवळाकॅण्डी, आवळा सुपारी असे पदार्थ तर केले जातातच, पण आवळ्याचं लोणचंही अतिशय चवदार होतं.

कडू कारलं बहुतांश लाेकांना आवडत नाही. त्याची भाजीही अनेकजण पानात वाढूनही घेत नाहीत. पण कारल्याचं लोणचं मात्र खूप चविष्ट होतं. यावेळी ते नक्की ट्राय करून पाहा. कारल्याचं लोणचं तुम्ही वर्षभरही कधीही करू शकता. कारण कारले नेहमीच मिळतात.

हिवाळ्यात मटारच्या हिरव्यागार शेंगा बघताच लगेच खाव्या वाटतात. या मटारच्या दाण्यांचं इंस्टंट लोणचंही अतिशय चटकमटक होतं. फक्त ते १ ते २ दिवसच टिकू शकतं. ते लोणचंही यंदा हिवाळ्यात नक्की ट्राय करून पाहा.