..म्हणून ब्रेकअपनंतर नवीन हेअरकट करतात महिला! रिसर्चचा दावा, प्रेमभंगानंतर स्वत:ला सावरायचं तर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:07 IST2026-02-04T10:17:41+5:302026-02-04T15:07:24+5:30
After Breakup Haircut : अचानक अशाप्रकारे केस कापण्याकडे फॅशन ट्रेंड किंवा क्लीशे म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. मुळात या बदलामागे मोठं सायकॉलॉजिकल कारण लपलेलं असतं.

After Breakup Haircut : काही वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये जर ब्रेकअप झालं तर याचा दोन्ही व्यक्तींच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. डोक्यात वेगवेगळी घालमेल सुरू असते. ब्रेकअपच्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. आपण कधी नोटीस केलं असेल की, एखाद्या मोठ्या ब्रेकअपनंतर महिला किंवा तरूणी अचानक केस कापतात आणि हेअर स्टाइल बदलतात. पण अचानक अशाप्रकारे केस कापण्याकडे फॅशन ट्रेंड किंवा क्लीशे म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. मुळात या बदलामागे मोठं सायकॉलॉजिकल कारण लपलेलं असतं.

काही रिसर्च सांगतात की, ब्रेकअपनंतर केस कापणं हा काही केवळ एक दिखावा नसतो, हा स्वत:ला सांभाळण्याचा आणि आपली ओळख परत मिळवण्याचा एक प्रयत्न असतो. अशात हेअरकटने महिलांना ब्रेकअपनंतर कशी मदत मिळते हा समजून घेऊयात.

ओळख हरवणं आणि स्वत:ला शोधणं
पर्सनॅलिटी अॅन्ड सोशल सायकॉलॉजी बुलेटिनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जेव्हा दोन व्यक्ती एका सिरिअस नात्यात असतात, तेव्हा त्यांची ओळख एकमेकांशी जुळलेली असते. त्यांचं रोज लाइफ, स्वप्ने आणि इतकंच नाही तर स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोनही ते शेअर करत असतात. पण जेव्हा हे नातं तुटतं, तेव्हा आपल्याला केवळ पार्टनर गमावल्याचं दु:खं नसतं, तर अशीही जाणीव होते की, आपली ओळख पुसली गेली आहे. सायकॉलॉजिस्ट याला सेल्फ-कॉन्सेप्ट क्लॅरिटीमध्ये कमतरता म्हणतात. अशात केस कापणं हा ही धुसर झालेली ओळख स्वच्छ करण्याचं एक माध्यम ठरतो.

कंट्रोलची इच्छा
ब्रेकअप एक अशा काळ असतो, ज्यात व्यक्तीला वाटतं की, जगणं त्याच्या हातातून निसटत चाललं आहे. आपण एखाद्या दुसऱ्याच्या भावनांना नियंत्रित करू शकत नाही. पण आपण आपलं शरीर आणि दिखाव्यावर नियंत्रण ठेवू शकतो.

सायकॉलॉजिस्ट सांगतात की, जेव्हा व्यक्ती स्वत:ला लाचार समजते, तेव्हा ते छोटी छोटी पाऊलं घेतात. ज्याद्वारे त्यांना असं जाणवतं की, त्यांच्या जीवनाचं नियंत्रण पूर्णपणे त्यांच्याकडे आहे. एक नवीन हेअर कट हाच कंट्रोल परत मिळवण्याची एक पद्धत आहे.

बदलाचा संकेत
केस हे आपल्या शारीरिक ओळखीचा एक अतिशय ठळक भाग असतात. त्यामुळेच अनेक लोक ब्रेकअपनंतर केस कापून घेतात किंवा नवीन हेअर कलर ट्राय करतात. यामागचा उद्देश असा असतो की, आता आपण पूर्वीसारखे राहिलो नाही, आपण बदललो आहोत हे स्वतःला आणि जगाला दाखवणे. असा हेअरकट एक प्रकारचा व्हिज्युअल रिसेट ठरतो. तो आपल्या आयुष्यातील नव्या टप्प्याची सुरुवात दर्शवतो.

भावना व्यक्त करण्याचा मार्ग
मोठ्या बदलानंतर स्वतःला त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. अशा वेळी केस कापण्यासारखे छोटे बदल हा ट्रांझिशन सोपा करतात. यामुळे दुःख पचवण्यास, भावना मोकळ्या करण्यास आणि मन स्थिर करण्यास मदत होते. अशा बदलांमुळे अनेकांना अधिक स्वतंत्र, हलके आणि आत्मविश्वासपूर्ण वाटू लागते.

















