तोंड कधी बंद ठेवावं? या ७ ठिकाणी आपलं तोंड कधीच उघडू नका, बोलणंच टाळा..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:51 IST2026-03-01T16:57:41+5:302026-03-02T12:51:51+5:30
When To Speak When To Keep Quiet : जर कोणी विश्वासानं तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली आहे तर ती इतरत्र न सांगता तोंड बंद ठेवावे.

माणूस काय बोलतो यापेक्षा तो कधी शांत राहतो याला व्यवहारात जास्त महत्व असते. मौन हे अनेकदा शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरते. तोंड कधी बंद ठेवावे ते समजून घेऊ. (When To Speak When To Keep Quiet)

जेव्हा तुम्ही रागात असता
जेव्हा तुम्हाला खूपच राग आलेला असतो तेव्हा रागच्या भरात चुकीचे शब्द बाहेर पडू शकतात. अशावेळी शांत राहणंच उत्तम. (When Not To Talk 7 Ways To Decide Whether Silence Is Best)

जेव्हा तुम्हाला काही माहिती नसते
ज्या विषयाबद्दल तुम्हाला पूर्ण ज्ञान नाही किंवा माहिती नाही. तिथे बोलण्यापेक्षा ऐकून घेणं जास्त उत्तम ठरतं.

निंदा केली जात असेल
जिथे कोणाची उणीदुणी काढली जात असतील किंवा अफवा पसरवल्या जात असतील तर तिथे च्या चर्चेत सहभागी न होता गप्प राहावे.

कोणाला अपमान होईल असं वाटत असेल तेव्हा
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बोलण्यामुळ समोरच्याचा विनाकारण अपमान होईल किंवा गैससमज वाढतील तर मौन पाळा.

तुमच्या विचारांचा अनादर
समोरची व्यक्ती जर तुमच्या विचारांचा आदर करत नसेल किंवा ऐकून घेण्यास तयार नसेल तर तिथे बोलणे म्हणजे उर्जेचा अपव्यय आहे.

कोणी विश्वासानं काही सांगितले तर
जर कोणी विश्वासानं तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली आहे तर ती इतरत्र न सांगता तोंड बंद ठेवावे.

वाद वाढत असतील तर
जर वादविवादाचे रुपांतर भांडणात होत असेल तर तो विषय थांबवण्यासाठी एकका बाजूनं शांत होणं शहाणपाचं ठरतं.

















