एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:29 IST2025-07-31T15:14:42+5:302025-07-31T15:29:34+5:30

साखर आरोग्यासाठी घातक असल्याने अनेकजण साखर खाणं टाळतात. तसेच गोड पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर मन मारतात.

जेव्हा जेव्हा लोक वजन कमी करण्याचा निर्णय घेतात किंवा त्यांच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देतात तेव्हा आरोग्य तज्ज्ञ आणि डाएटीशन त्यांना साखर किंवा गोड पदार्थ सोडून देण्याचा सल्ला देतात.

साखर आरोग्यासाठी घातक असल्याने अनेकजण साखर खाणं टाळतात. तसेच गोड पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर मन मारतात.

आपण जे काही खातो त्याचा आरोग्यावर निश्चितच परिणाम होतो, मात्र त्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते कधी आणि कसं खाता? तुम्ही साखर कधी खाता हे ती खाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे.

न्यूट्रिशनिस्ट नीलांजना सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही गोड खाण्याची योग्य वेळ ठरवली तर त्याचा तुमची ब्लड शुगर लेव्हल आणि आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

गोड खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते आणि लठ्ठपणा देखील वाढतो. परंतु नीलांजना सिंह यांच्या मते जर योग्य पद्धतीने खाल्लं तर ब्लड शुगर लेव्हलला हानी पोहोचवत नाही.

गोड खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅटने समृद्ध संतुलित आहार घेता. सोप्या शब्दांत सांगायचं तर, जेवणानंतरच गोड पदार्थ खावेत.

कारण हे प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट पचनक्रिया मंदावतात, ब्लड शुगर लेव्हल लवकर वाढण्यापासून रोखतात आणि शरीराला साखर हळूहळू अब्जॉर्ब करण्यास मदत करतात.

जेवणाची सुरुवात सॅलड, शिजवलेल्या भाज्या, मसूर, बीन्स यासारख्या फायबरयुक्त पदार्थांनी करा. त्यानंतर, प्रोटीनयुक्त पदार्थ खा. एकदा तुम्ही हे खाल्लं की, त्यानंतर थोडं गोड खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल जास्त वाढणार नाही.

आहारात हेल्दी फॅट्स समाविष्ट करायला विसरू नका. हेल्दी फॅट्स ग्लूकोज अब्जॉर्पशन जास्त कंट्रोल करतात, समाधान देतात आणि जास्त खाण्याची इच्छा कमी करतात. त्यामुळे वजन कमी होऊ शकतं.

उपाशी पोटी किंवा जेवणाच्या दरम्यान गोड पदार्थ खाल्ल्याने साखर लवकर अब्जॉर्ब होते आणि ब्लड शुगर लेव्हल वाढते. यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो आणि तुम्हाला वारंवार गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे पोटी गोड पदार्थ खाणं टाळा.