कॅन्सर नेमका कशामुळे होतो? १० कारणं, आजाराचं कारण ओळखा-तब्येत सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:17 IST2026-03-05T14:50:22+5:302026-03-05T15:17:48+5:30

What Are The Causes Of Cancer : हवेतील प्रदूषण, बेंझिन, आर्सेनिक आणि विशिष्ट रसायनं यांच्या सततच्या संपर्कामुळे कॅन्सर होऊ शकतो.

कॅन्सर (Cancer) हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा एक गंभीर आजार आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या संशोधनावर आधारीक माहिती समजून घेऊ.

नॅशनल कॅन्सर इन्टिट्यूटच्या अहवालानुसार कॅन्सर हा फक्त आजार नसून तो शंभरहून अधिक आजारांचा समूह आहे. शरीरातील सेल्युलर मॅकेनिझम बिघडल्यामुळे पेशी नष्ट न होता ट्यूमर तयार करतात.

कॅन्सरची सुरूवात पेशींच्या डिएनएमध्ये होणाऱ्या बदलांमुळे होते. जेव्हा हे बदल पेशींना वाढवण्याचे किंवा मरण्याचे संकेत देणाऱ्या जीन्समध्ये बिघाड करतात तेव्हा पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात.

जगभरातील कॅन्सरच्या मृत्यूंपैकी सुमारे २२ टक्के मृत्यू हे तंबाखूच्या सेवनानं होतात. यामध्ये फुफ्फुसं, तोंड आणि घशाच्या कॅन्सरचा समावेश आहे.

पर्यावरणातील काही घटक जसं की एस्बेस्टॉस, रेडीएशन आणि अतिनील किरणं थेट डीएनएला इजा पोहोचवून कॅन्सरला कारणीभूत ठरतात.

अतिलठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि प्रक्रिया केलेले अन्न यामुळे शरीरातल दीर्घकाळ दाह राहतो जो कॅन्सरचा धोका वाढवतो.

काही प्रकारचे व्हायरस जसं की ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तर हिपॅटायटीस बी आणि सी मुळे यकृताचा कॅन्सर होऊ शकतो.

सुमारे ५ ते १० टक्के कॅन्सर हे पालकांकडून मुलांकडे येणाऱ्या सदोष जनुकांमुळे होतात. शरीरातील हॉर्मोन्सची पातळी अनियंत्रित झाल्यास स्तन किंवा गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

हवेतील प्रदूषण, बेंझिन, आर्सेनिक आणि विशिष्ट रसायनं यांच्या सततच्या संपर्कामुळे कॅन्सर होऊ शकतो.

शरीरात अति चरबी साठल्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते आणि इ्फ्लेमेटरी सायटोकाईन्स तयार होतात. जे कॅन्सरच्या पेशींच्या वाढीला खतपाणी घालतात.