८ दिवस टिकणारा टोमॅटोचा झणझणीत ठेचा, चटकन होणाऱ्या चविष्ट पदार्थाची सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2026 09:40 IST2026-03-07T09:37:07+5:302026-03-07T09:40:02+5:30

टोमॅटोची भाजी आणि मिरच्यांचा ठेचा हे पदार्थ तर आपल्याला माहिती आहे. आता मात्र या दोन्ही पदार्थांचं मस्त कॉम्बिनेशन करून पाहा.. हा पदार्थ म्हणजे टोमॅटोचा ठेचा...

यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये थोडं तेल घालून ७ ते ८ हिरव्या मिरच्या ७ ते ८ लसूण पाकळ्या घाला.

यानंतर २ मध्यम आकाराचे टोमॅटो गाेलाकार चिरून घ्या आणि ते देखील कढईमध्ये ठेवून परतून घ्या.

टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या छान परतून झाल्या की मग गॅस बंद करा. त्यामध्ये १ ते २ चमचे दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ घाला आणि बत्त्याने सगळे पदार्थ ठेचून एकजीव करून घ्या.

मस्त लालेलाल टोमॅटो ठेचा तयार. हा ठेचा फ्रिजमध्ये ठेवल्यास ८ दिवस चांगला टिकतो.