उन्हाळ्यात रोज वापरायला खास कॉटनचे नाईट ड्रेस; १० मऊ पॅटर्न, कूल दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:08 IST2026-02-25T15:54:49+5:302026-02-26T19:08:05+5:30

Summer Special 10 Night Dress Patterns : बाजारात सध्या कॉटनच्या नायटी, पायजमा, टी शर्ट आणि शर्ट्स असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत जे आरामदायी आणि फॅशनेबल दिसतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत सुती कपड्यांना पहिली पसंती दिली जाते आणि नाईट ड्रेस कॉटनचे असणं खूपच महत्वाचं आहे. (Summer Special 10 Cotton Night Dress Patterns)

नाईट ड्रेसचं कापड सती असल्यामुळे त्यात नैसर्गिकरित्या हवा खेळती राहते. ज्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. (Summer Special 10 Cotton Night Dress Designs)

कॉटनचे कपडे घाम लवकर शोषून घेतात. परिणामी त्वचेला कोरडे आणि ताजेतवाने वाटते. (Women's Wear)

सुती कापड अत्यंत मऊ असते. त्यामुळे उन्हाळ्यात होणारी रॅशेस किंवा खास यांसारख्या त्वचेच्या समस्या टाळता येतात.

हे कपड वजनाला हलके असल्यामुळे झोपेत असताना शरीराला कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत नाही.

कॉटनचे कपडे धुण्यास सोपे आणि लवकर सुकणारे असतात. त्यामुळे रोजच्या वापरासाठी ते सोयीस्कर ठरतात.

बाजारात सध्या कॉटनच्या नायटी, पायजमा, टी शर्ट आणि शर्ट्स असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत जे आरामदायी आणि फॅशनेबल दिसतात.

अंगाला टोचणारे किंवा घाम साठवणारे कपडे नसल्यामुळे गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

कॉटन हे नैसर्गिक धाग्यांपासून बनत असल्यामुळे ते पर्यावरणासाठीही सुरक्षित आणि शाश्वत पर्याय आहे.

३०० ते ५०० रूपये या रेंजमध्ये तुम्हाला उत्तम प्रतीचे नाईट सुट्स मिळतील. कॉटनच्या मॅक्सीज विकत घेण्यापेक्षा तुम्ही नाईट ड्रेस घेऊ शकता.